26.1 C
New Delhi
Sunday, August 10, 2025
Homeमनोरंजनकरिश्मा कपूर यांचे माजी पती संजय कपूर यांचे आकस्मिक निधन

करिश्मा कपूर यांचे माजी पती संजय कपूर यांचे आकस्मिक निधन

पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका

Sunjay Kapur Death |  मुंबई बॉलिवूडमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapur)यांचे माजी पती आणि उद्योगपती संजय कपूर (Sunjay Kapur) यांचं वयाच्या ५३व्या वर्षी अचानक निधन झालं आहे. यूकेमध्ये पोलो खेळताना मैदानावरच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि काही क्षणांतच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

संजय कपूर हे भारतातील प्रसिद्ध ऑटो कंपोनंट्स कंपनी सोना कॉमस्टार चे चेअरमन होते. त्यांच्या निधनाने केवळ कपूर आणि सचदेव कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण कॉर्पोरेट जगतावरही शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने एक यशस्वी उद्योजक आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

विशेष म्हणजे, निधनाच्या काही तासांपूर्वीच संजय कपूर यांनी अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघातावर ट्विटरद्वारे शोक व्यक्त केला होता. हेच ट्वीट आता त्यांचे शेवटचे शब्द ठरले असून, त्यांच्या संवेदनशीलतेची आठवण करून देणारे आहे.

संजय कपूर (Sunjay Kapur Death)आणि करिश्मा कपूर यांचं लग्न २००३ साली झालं होतं, मात्र २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी प्रिया सचदेव हिच्याशी विवाह केला. संजय कपूर यांना तीन मुले आहेत – करिश्माशी असलेल्या समायरा आणि कियान, तर प्रियासोबतचा मुलगा अजारियस केवळ सात वर्षांचा आहे.

पोलो सारख्या उच्चभ्रू खेळात सक्रिय असलेल्या संजय कपूर यांचा असा अचानक अंत होणं हे अनेकांसाठी धक्कादायक ठरत आहे. मृत्यूपूर्वी दुसऱ्यांच्या दुःखावर शोक व्यक्त करणाऱ्या व्यक्तीने काही तासांतच जगाचा निरोप घेणं, ही बाब काळजाला चटका लावणारी आहे.


NEWS TITLE- Karishma Kapoor’s Ex-Husband Sunjay Kapur Passes Away Suddenly



RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
26.1 ° C
26.1 °
26.1 °
80 %
0.8kmh
58 %
Sun
34 °
Mon
36 °
Tue
34 °
Wed
34 °
Thu
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!