20.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeमनोरंजनझी स्टुडिओज घेऊन येत आहे एक रुबाबदार लव्हस्टोरी!

झी स्टुडिओज घेऊन येत आहे एक रुबाबदार लव्हस्टोरी!

नवनवीन विषय, वेगवेगळे आशय आणि प्रेक्षकांच्या बदलत्या आवडी लक्षात घेत झी स्टुडिओज सातत्याने मराठी सिनेसृष्टीत वेगळे प्रयोग सादर करत आहे. आशयघन सामाजिक कथा, कौटुंबिक भावविश्व ते मनोरंजनप्रधान चित्रपटांपर्यंतचा प्रवास करत, आता झी स्टुडिओज प्रेक्षकांसाठी एक स्टायलिश, रुबाबदार लव्हस्टोरी घेऊन येत आहे. ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही टॅगलाईन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

टीझरमधून समोर येणारी कथा ही एका डॅशिंग, रुबाबदार नायकाची आणि त्याच्या ड्रीम गर्लची आहे. मात्र ही केवळ गोडगुलाबी प्रेमकहाणी नसून, एक रूबाबदार प्रेमकहाणी आहे. प्रेमासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असलेला, स्वतःचे नियम स्वतः ठरवणाऱ्या या नायकाची प्रेमकहाणी सगळ्यांनाच जबरदस्त आवडेल हे नक्की. प्रेमकहाणीला डॅशिंग टच देत भावनांचा समतोल साधणारा हा चित्रपट तरुणाईला नक्कीच आवडेल.

दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, “ ‘रुबाब’ हा चित्रपट स्वतःचा ठाम आवाज असलेल्या तरुणाईची कथा आहे. आजच्या पिढीचे प्रेम प्रामाणिक असते मात्र त्यात एक स्वॅग असतो. तोच रुबाब आम्ही या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.”

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जनावलेकर म्हणतात, “मराठी प्रेक्षक सतत नवीन, फ्रेश आणि स्टायलिश आशयाची अपेक्षा ठेवतात. ‘रुबाब’मध्ये एक दमदार प्रेमकहाणी आहे, जी आजच्या तरुणाईच्या अ‍ॅटिट्यूडशी जोडलेली आहे. ‘रुबाब’ हा चित्रपट मनोरंजनासोबतच तरुणाईची ऊर्जा आणि भावना मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडतो. ही केवळ रोमँटिक लव्हस्टोरी नाही, तर प्रेमासाठी उभे राहाण्याची, स्वतःच्या तत्वांवर जगण्याची आणि भावनांना निर्भीडपणे व्यक्त करण्याची गोष्ट आहे.”

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते आहेत तर उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे व शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारीपासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
37 %
3.6kmh
36 %
Tue
20 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!