पुणे: भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्याकरीता रेड अलर्ट आणि उद्या 26 सप्टेंबर रोजी यलो अलर्टचा इशारा दिला असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व धरणे भरलेली असून धरणक्षेत्रात सततधार पडत असलेल्या पावसामुळे पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.
तरी नदी पात्रातील वाढ होणाऱ्या पाण्याच्या अनुषंगाने सर्व विभागांनी नदीकाठच्या झोपड्या, वस्त्या व परिसरात आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. व्यक्ती, साहित्य, वाहने, जनावरे, टपऱ्या, दुकाने इत्यादी तात्काळ हलविण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी इतर संबंधित विभागाच्या मदतीने पर्जन्याच्या अनुषंगाने वेळोवेळी गावनिहाय आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात, असेही निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहेत.
अतिपर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
34.1
°
C
34.1
°
34.1
°
61 %
3.4kmh
96 %
Fri
34
°
Sat
41
°
Sun
39
°
Mon
31
°
Tue
36
°