10.1 C
New Delhi
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रअपात्र बहिणींना लाभ सोडण्याचे सरकार कडून आवाहन

अपात्र बहिणींना लाभ सोडण्याचे सरकार कडून आवाहन

पुणे: राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार स्थापन झाल्यावर लाडकी बहीण ladaki bahin योजनेच्या अपात्र असतांना या योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी अद्याप कारवाई झाली नसली तरी, स्वतःहून कोणी लाभ सोडण्यासाठी अर्ज करत असेल तर त्यांचा अर्ज जिल्हा पातळीवर वगळण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी collector यांच्या नावाने लॉगिन दिले जाणार असून ही प्रक्रिया जिल्हापातळीवर केली जाणार आहे.

ज्या बहिणीला लाभ घ्यायचा नसेल त्यांनी तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) किंवा जिल्हा परिषदेकडे या बाबत लेखी अर्ज करावा लागणार आहे. या अर्जात या योजनेचा लाभ स्वतःहून सोडत असल्याचे लिहून द्यावे लागणार आहे. त्यांनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉगिनवरून आलेल्या अर्जातील नावे वगळण्याची प्रक्रिया के जाणार आहे. पुणे जिल्ह्यात यापूर्वीच दोन महिलांनी या योजनेचा लाभ स्वतःहून नाकारत असल्याचे अर्ज प्रशासनाला दिले आहेत.

या योजनेचा लाभ सोडण्यास इकचुन असणाऱ्या महिलांना अर्ज द्यावा लागणार आहे. या साठी जिल्हाधिकारी यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्याला लॉग ईंन देण्यात आले आहे. ज्या बहीणी स्वतःहून योजना नाकारणार असेल त्या सर्वांचे अर्ज घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉग ईंनवरुण जिल्हापातळीवर संबंधित महिलेचे नाव वगळले जावे अशी सूचना महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनूप कुमार यादव यांनी घेतलेल्या बैठकीत राज्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याची अंमलबजावणी पुढील काही दिवसांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अर्ज थेट बाद करणे, तक्रार आल्यास अर्ज बाद करण्याच्या कुठल्याही सूचना देण्यात आल्या नाहीत.

पुणे जिल्ह्यात २१ लाख ११ हजार ९९१ महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. यातील २० लाख ८९ हजार ९४६ महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर आचारसंहिता संपल्यानंतर थांबलेली अर्ज छाननी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता खात्यावर जमा झाला. त्यानंतर ता. १८ डिसेंबर पासून अर्ज असलेले पोर्टल बंद करण्यात आले. त्याचे कुठलेही कारण जिल्हाप्रशासनाला राज्याकडून कळविण्यात आले नाही. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
10.1 ° C
10.1 °
10.1 °
100 %
0kmh
18 %
Wed
22 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
23 °
Sun
21 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!