इंदापूर- प्रतिनिधी : इंदापूर ते आदमापूर दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. इंदापूर आगाराच्या वतीने ही बस नव्या वेळापत्रकानुसार सुरू करण्यात आली असून, प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
ही बस इंदापूर येथून दररोज सकाळी ९.०० वाजता सुटणार असून, आदमापूर येथून सकाळी ७.०० वाजता इंदापूरकडे रवाना होणार आहे. इंदापूरहून सुटलेली बस वालचंदनगर येथे आल्यानंतर वालचंदनगर व कळंब परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने बस स्थानकात वाहतूक नियंत्रक दीपक खुडे व इतर ग्रामस्थांनी स्वागत केले.

ही बस इंदापूर – वालचंदनगर – नातेपुते – शिंगणापूर – दहिवडी – कराड – कोल्हापूर मार्गे आदमापूर येथे पोहोचणार असून, याच मार्गाने परतीचा प्रवास करणार आहे.
बसचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
वालचंदनगर – सकाळी १०.००
नातेपुते – सकाळी १०.३०
दहिवडी – सकाळी ११.३०
कराड – दुपारी २.००
कोल्हापूर – दुपारी ३.३०
आदमापूर – सायंकाळी ५.००
इंदापूर ते आदमापूर दरम्यान सुरू झालेल्या या नव्या बस सेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इंदापूर आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. गोसावी, वाहतूक अधीक्षक श्री. वायदंडे व वाहतूक निरीक्षक श्री. भोसले यांनी केले आहे.


