24.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमहाराष्ट्रइंद्रायणीनगर , बालाजीनगरमधून अजित गव्हाणे यांना 'लीड' मिळवून देण्याची जबाबदारी आमची !

इंद्रायणीनगर , बालाजीनगरमधून अजित गव्हाणे यांना ‘लीड’ मिळवून देण्याची जबाबदारी आमची !

सीमा सावळे, संजय वाबळे, रवी लांडगे, विक्रांत लांडे यांनी प्रचारात आणली रंगत

भोसरी -इंद्रायणीनगर, बालाजीनगर परिसरातील शांतता आणि सलोखा महत्त्वाचा आहे असे म्हणत परिसरातील ज्येष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवक गुरुवारी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरते. इंद्रायणीनगर , बालाजीनगरमधून अजित गव्हाणे यांना ‘लीड’ मिळवून देण्याची जबाबदारी आमची असे म्हणत या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारात चांगलीच रंगत आणली. दरम्यान भोसरी येथे बुधवारी झालेल्या शरद पवार यांच्या सभेमुळे वातावरण फिरले असल्याची प्रचिती या प्रचार दौऱ्यातील गर्दीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली.महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि 14) प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रचार दौऱ्यात सहभागी झालेल्या माजी नगरसेवक, जेष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. यावेळी बालाजीनगर, इंद्रायणीनगर मधून अजित गव्हाणे यांना ‘लीड ‘ मिळवून देण्याची जबाबदारी आमची असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अजित गव्हाणे यांनी गुरुवारी बालाजीनगर येथून प्रचाराला सुरुवात केली. या परिसरातील गणपती मंदिर, दुर्गा माता मंदिर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर येथे त्यांनी दर्शन घेतले. यावेळी विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित गव्हाणे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यामध्ये समता मंडळ, साम्राज्य प्रतिष्ठान, वीर हनुमान, उत्कृष्ट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गव्हाणे यांचे स्वागत केले. मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांना अजित गव्हाणे यांचा नेहमीच पाठिंबा असतो.त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व त्यांचे कुटुंबीय गव्हाणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
24.1 ° C
24.1 °
24.1 °
31 %
1.5kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!