28.6 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर समांतर पुलाचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर समांतर पुलाचे लोकार्पण

पिंपरी :- पिंपरी येथील पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर दरम्यान पवना नदीवरील समांतर पुलाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाल्याची माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, पिंपरी येथील पिंपरी येथील पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील समांतर पुलाचे काम स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत व्ही.एम.मातेरे या संस्थेला देण्यात आले होते. सदर पुलाचे काम पूर्ण होऊन आज महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते सकाळी ९ वाजता करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, नगरसेवक संदीप वाघेरे, नाना काटे, शत्रुघ्न उर्फ बापू काटे, निकिता कदम, निर्मला कुटे, डब्बू आसवानी, सह शहर अभियंता प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, उपअभियंता अभिमान भोसले, कनिष्ठ अभियंता संतोष कुदळे, प्रणिता पिंजण सामाजिक कार्यकर्ते सतीश वाघेरे, अनिल रसाळ, बाबा मोरे, हनुमंत वाघेरे, सचिन गव्हाणे, कमलेश वाघेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
28.6 ° C
28.6 °
28.6 °
77 %
3.3kmh
37 %
Tue
29 °
Wed
38 °
Thu
40 °
Fri
38 °
Sat
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!