27.5 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeमहाराष्ट्रकपाळीच्या आडव्या कुंकवाने, भले भले आडवे केले'

कपाळीच्या आडव्या कुंकवाने, भले भले आडवे केले’

- ज्ञानज्योती सावित्रीबाईंना भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांचे कवितेतून अभिवादन

काव्यरचनांतून उलगडली सावित्री-जोती, भिडेवाड्याची महती

  • ‘आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार’ सोहळ्याने पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचा समारोप

पुणे : ‘तिला संपवायला निघालेले, स्वतःच संपून गेले, कपाळीच्या आडव्या कुंकवाने, भले भले आडवे केले’, ‘मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला, भिडे वाडा बोलला’, ‘मी भिडेवाडा बोलतोय’, ‘सावित्रीमाय तुले कविता करस’, ‘जाली सुरु चलयाची शाळा भिडेवाड्यान’, ‘शिक्षणाचा सूर्य उगवला वाड्यात भिडेच्या पुण्याला’, ‘माय सावित्री तुला वंदन विजयचे’, ‘उन्हायान ऊन झेल पावसायन पाणी झेल’ अशा मराठी, अहिराणी, कोकणी, गुजराती, मारवाडी, कन्नड भाषेत सादर झालेल्या काव्यरचनांतून सावित्री-जोती, भिडेवाड्याची महती उलगडली.

भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात महाराष्ट्रासह देशविदेशातून ६०० कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार यामध्ये सहभागी झाले. चार दिवसांच्या या फेस्टिवलमध्ये जवळपास १५०० रसिकांनी उपस्थिती लावली. सहभागी ६०० कवींना भारतीय संविधानाची प्रत, सन्मानचिन्ह, फुलेप्रेमी लेखणी व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. संविधानाबाबत जागृती, प्रचार करण्याच्या उद्देशाने संविधान जागर अभियान राबविण्यात आले.

संयोजक विजय वडवेराव म्हणाले, “देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुले दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन केले होते. देश-विदेशातील सहाशे कवींचा काव्य महोत्सव, भिडेवाड्यावर मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगितिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम फेस्टिव्हलमध्ये झाले. ऑस्ट्रेलिया, अबुधाबी, दुबई या देशांतून, तसेच केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, तेलंगणा, उत्तरप्रदेश आदी राज्यातून कवी-कवयित्री सहभागी झाले. यापुढे पुण्यात दरवर्षी भव्य आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे.”

भिडेवाडा अभियानात विशेष कार्य करणाऱ्या जगभरातील २५ फुलेप्रेमी कवी, कवयित्री व कार्यकर्त्यांना फेस्टिव्हलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये क्रांती वेंदे (धुळे), पूनम पाटील (जळगाव), नंदा मघाडे (जळगाव), कांचन मून (पुणे), प्रतिभा कीर्तीकर्वे (पुणे), सरिता कलढोणे (पुणे), वनिता जाधव (बारामती), सुनिता नाईक (खेड), बा. ह. मगदूम (सांगली), एम. डी. कदम (सांगली), आनंद चोपडे (बेळगाव कर्नाटक), मनोज भार शंकर (अबुधाबी), अरविंद बनसोडे (पुणे), विशाल बोरे (अकोला), प्रा. माया मुळे (धाराशिव), डॉ. दिलीप नेवसे (सातारा), सुमनताई मनवर (यवतमाळ), संगिता कानिंदे (यवतमाळ), वर्षा शिंदे (पुणे), उमेश शिरगुप्पे (गोवा), विमल वाणी (जळगाव), ओवी काळे (श्रीरामपूर), सुगलाबाई वडवेराव (पुणे), छाया बैसाणे (चाळीसगाव), राजू जाधव (चिंचवड) यांना सन्मानित करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
27.5 ° C
27.5 °
27.5 °
40 %
3.3kmh
0 %
Thu
28 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!