पुणे: नवा विष्णू चौक मित्र मंडळाच्या वतीने कलासाधक स्त्रीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कलाक्षेत्रातील नऊ कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला.
सदाशिव पेठेतील नवा विष्णू चौक मित्र मंडळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. संगीता मावळे यांच्या हस्ते महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमित सुरगुडे, कार्याध्यक्ष कुमार रेणुसे उपस्थित होते. पल्लवी सोनकुळ, माला पवार, पूनम गांधी, आशा सोनकुळ, अपर्णा पोळ, मनीषा सोनकुळ यांनी आयोजनात सहभाग घेतला.
माधुरी जोशी, विनिता देशपांडे, विनया देसाई, डॉ. भाग्यश्री काळे पाटसकर, रश्मी देव, सुचेता वाडेकर, आस्था गोडबोले कार्लेकर, मैत्रेयी बापट यांना सन्मानित करण्यात आले. जान्हवी धारिवाल बालन यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संगीता मावळे म्हणाल्या, स्त्री आणि त्यासोबत आव्हाने हे ओघानेच येते. कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्त्रियांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तरीही या आव्हानांना सामोरे जात जगाला प्रकाशित करण्याचे काम समस्त स्त्रिया करीत आहेत.
विनया देसाई म्हणाल्या सद्गुण अंगात असणे ही भगवंताची कृपा असते. त्यामधून कलेची सेवा करण्याची संधी महिलांना मिळते. चैतन्य रूपाने देवी ही प्रत्येक स्त्रीच्या मध्ये वास करत असते. त्यांना मिळणारा सन्मान हा ऊर्जा देणारा असतो, काम करण्याची शक्ती यातून मिळते असेही त्यांनी सांगितले. मृणालिनी दुसाने यांनी सूत्रसंचालन केले.