19.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमहाराष्ट्रचिंचवडच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे तयार - भाऊसाहेब भोईर

चिंचवडच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे तयार – भाऊसाहेब भोईर

चिंचवड मतदार संघातील जनता मला विधानसभेत पाठवेल… जनतेवर माझा ठाम विश्वास - भाऊसाहेब भोईर

चिंचवड, -: सांगवी येथून प्रचार शुभारंभ झाल्यापासून आतापर्यंत प्रचाराच्या पूर्वार्धात प्रत्यक्ष मतदारांना जावून भेटणे आणि त्यांच्याशी सुसंवाद साधण्यावर भर देत चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर मोठ्या उत्साहात प्रचार करीत आहेत. आज सकाळच्या सत्रात वाल्हेकरवाडी परिसरातील मतदार बंधू भगिनींच्या गाठी भेटी घेवून संवाद साधला. यावेळी भाऊसाहेब भोईर युवा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांसह इतर मान्यवर देखील उपस्थित होते.

याप्रसंगी भोईर म्हणाले की आजच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या युगात तांत्रिक दृष्ट्या आपण प्रगत झालो असलो तरी माणसां – माणसातील संवाद दुरावत चालला आहे. तो प्रत्यक्ष भेटीतून घडावा. त्यातून आपल्यातील स्नेह वाढत जावा याच उद्देशाने प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात जन जनसंवाद साधण्यासाठी प्रत्यक्ष लोकांच्या घरी जावून मी भेटी घेत आहे. या भेटीतूनच आपलेपणा जाणवतो, बंधुभाव जोपासला जातो. निवडणुका असो किंवा नसो माझा जनतेशी जनसंवाद सुरू असतोच, पण सध्या मला संवादा बरोबरच लोकांच्या मतांचा मोठा पाठिंबा हवाय. सुसंवादाचे रूपांतर मतदानात व्हावे अशी भावना यावेळी उपस्थित असलेल्या जनतेशी भाऊसाहेब भोईर यांनी केली.

ते पुढे म्हणाले की चिंचवडच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे तयार आहे. चिंचवड मतदार संघाचा विकास करून घ्यायचा असेल तर जनतेने कपाट चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी आता जनतेने हाती घेतली पाहिजे. माझा सर्वच क्षेत्रातील असलेला जनसंपर्क चिंचवड मतदार संघा च्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहे. जनतेने मला खंबीरपणे साथ द्यावी चिंचवड मतदार संघाचे विकासासाठी मी कटिबद्ध आहे. तरी जनतेने सकारात्मक विचार करून माझ्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी केले.

याप्रसंगी वालेकरवाडी येथील संदीप भालके , आशिष कोर्टेकर , सुरज शिंदे , अरुण पवार , शुभम झोंबाडे , विशाल जाधव , दत्ता जाधव , अनिकेत भोगे , गणेश कवडे , बाळासाहेब वाल्हेकर , तात्या आहेर , श्रीधर  वालेकर , अशोक भालके , संदीप भालके , पोपट शिवले , सत्यवान शिवले , गोपाल दगडे , सुधीर हनवते , रमेश अवटी , अरुण पवार , आबा वाल्हेकर , ज्ञानेश्वर शिवले , राजेंद्र अवटी , बाळासाहेब वाल्हेकर, अशोक वाल्हेकर , गणेश कवडे इत्यादी मान्यवर भेटी गाठीत सहभागी होते.

सध्या माझ्या प्रचारात” मतदार स्वतः हून सहभागी होत आहेत. यावरून असं जाणवतंय की चिंचवड मतदार संघात नागरिकांना आता बदल हवा आहे. आणि त्यासाठी माझ्यासारख्या सुशिक्षित व्यक्तिमत्त्वाला आपला लोकप्रतिनिधी म्हणून लोकं माझ्याकडे पहात आहेत. माझ्या अनेक सकारात्मक बाजू आहेत. त्यामुळे लोकांचा विश्वास संपादन करीत असताना प्रत्यक्ष काम करण्यासाठी जनता मला विधानसभेत पाठवतील असा विश्वास आहे”

__ भाऊसाहेब भोईर ( अपक्ष उमेदवार : चिंचवड विधानसभा मतदारसंघ )

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
19.1 ° C
19.1 °
19.1 °
55 %
0kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!