चिंचवडच्या पश्चिम भागातून भोईरांना वाढता पाठिंबा, नागरिकांचा प्रचारात उस्फुर्त सहभाग
चिंचवड, : चिंचवडच्या बिजलीनगर, शिवनगरी भागातून अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून, आता नागरिकांनीच त्यांची प्रचार यंत्रणा हाती घेतल्याचे दिसून येत आहे. चिंचवड मतदार संघाने कायमच शहराच्या पूर्व भागातील आमदार दिला असल्याने पश्चिम भागात विकासाचा मोठा अनुशेष आहे, याबद्दल नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून यंदा भाऊसाहेब भोईर यांनाच मतदान करणार असा निर्धार लोक उघडपणे बोलून दाखवत आहेत.
चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज सकाळच्या सत्रात पदयात्रा आणि संवाद बैठका घेवून प्रचाराला सुरुवात केली. पदयात्रा आणि गाठी – भेटीतून चिंचवड विधानसभा मतदार संघातील लोकांचा कल जाणून घेतला. यातून लोकांना बदल हवा असल्याचे निदर्शनास आले असे भाऊसाहेब भोईर यांनी माध्येमंशी बोलतांना सांगितले.
आज बिजली नगर मधील शिवनगरी येथे मतदारांच्या भेटी घेवून त्यांनी संवाद साधला. यादरम्यान बिजलीनगर परिसरात त्यांनी पदयात्रा काढून प्रचाराला सुरुवात केली. पदयात्रेत सामान्य लोकं स्वयंस्फूर्तीने सहभागी होत होते. सध्य परिस्थितीत या भागात नागरिकांना काय काय समस्यांना तोंड द्यावे लागते त्याबद्दल चर्चा केली. नागरिकांना भेडसावणारे प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन भोईर यांनी यावेळी मतदारांना दिले.
गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा प्रदीर्ग अनुभव असल्यामुळे महनगरपालिकेत प्रतिनिधी असताना पासून प्राधिकरणाचा ज्या दैदिप्यमान स्वरूपात विकास केला त्यामध्ये प्रशस्त रस्ते, सुसज्ज प्रकाश योजना, क्रीडांगण, सांस्कृतिक भवन, अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, अंतर्गत पाणी पुरवठा वाहिनी अशी कित्येक कामाच्या अंमलबजावणीत माझा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे भाऊसाहेबांनी सांगितले.
ते पुढे असे म्हणाले की, तोच विशाल दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून चिंचवड मतदार संघाचा विकास करायचा आहे त्या दृष्टीने मी मास्टर प्लॅन तयार केला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मला मतदानाच्या रुपात जनतेचे आशीर्वाद दीले पाहिजेत असं मत भाऊसाहेबांनी यावेळी व्यक्त केले. नदी सुधार प्रकल्प हा महत्त्वपूर्ण उद्देश मी प्राधान्य क्रमाने पूर्ण करील अशी ग्वाही देखील दिली.
याप्रसंगी संवाद सुदाम परब , संतोष पाटील , जीतू पाटील , गणेश लोंढे, राहुल भोईर, भाऊसाहेब पाटील , रामकृष्ण पाटील, दिनेश पाटील, रवींद्र महाजन, अमित पाटील, सतीश पाटील, सुनील पाटील, कृष्णा भदाने इत्यादी मान्यवर या संवाद बैठकीमध्ये व पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते.