37.3 C
New Delhi
Friday, July 4, 2025
Homeमहाराष्ट्रचिखली येथील कुदळवाडी भागात;६८२ बांधकामे निष्कासित

चिखली येथील कुदळवाडी भागात;६८२ बांधकामे निष्कासित

पिंपरी, : चिखली येथील कुदळवाडी भागात आज सलग तिसऱ्या दिवशीही अतिक्रमण कारवाई करण्यात आली. ७७ एकर क्षेत्रामध्ये झालेल्या या कारवाईदरम्यान आज एकूण ६८२ बांधकामे निष्कासित करण्यात आली. शहरातील नियोजित विकास आरक्षणे आणि नागरिकांच्या सुविधांसाठी असलेल्या जागेवरील अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असून यापुढेही ती चालू राहणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि क्षेत्रीय धडक कारवाई पथकांमार्फत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये आज ३३ लाख ५८ हजार १३० चौरस फूट बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ६८२ बांधकामांचा समावेश होता.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कारवाईमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सुचेता पानसरे, अमित पंडित, किशोर ननवरे, उमेश ढाकणे, अजिंक्य येळे, शितल वाकडे, श्रीकांत कोळप यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते. सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, संदीप डोईफोडे, विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या कारवाईमध्ये महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील ४ कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलीस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले होते. १६ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटर यांचा वापर निष्कासन कारवाईमध्ये करण्यात आला. शिवाय ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका देखील येथे तैनात करण्यात आल्या होत्या. महापालिका यंत्रणेसह पोलीस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी देखील सहभागी झाले होते.

कुदळवाडी येथे आज अखेरपर्यंत करण्यात आलेली निष्कासनाची कारवाई

निष्कासनाची कारवाई करण्यात आलेला एकूण भूभाग –
८ फेब्रुवारी – ४२ एकर
९ फेब्रुवारी – १५७ एकर
१० फेब्रुवारी – ७७ एकर
एकूण – २७६ एकर

निष्कासित केलेली एकूण बांधकामे –
८ फेब्रुवारी – २२२
९ फेब्रुवारी – ६०७
१० फेब्रुवारी – ६८२
एकूण -१ हजार ५११

निष्कासित केलेल्या बांधकामांचे एकूण क्षेत्रफळ –
८ फेब्रुवारी – १८ लाख ३६ हजार चौरस भूट
९ फेब्रुवारी – ६८ लाख ७८ हजार चौरस फूट
१० फेब्रुवारी – ३३ लाख ५८ हजार चौरस फूट
एकूण – १ कोटी २० लाख ७२ हजार चौरस फूट

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
37.3 ° C
37.3 °
37.3 °
52 %
1.2kmh
82 %
Fri
37 °
Sat
42 °
Sun
39 °
Mon
32 °
Tue
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!