29.2 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्रछत्रपती शिवाजीनगर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करणार -...

छत्रपती शिवाजीनगर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करणार – मनीष आनंद

पुणे :  छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनीष आनंद (shivajinagar) यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. रविवारी त्यांनी वडारवाडी भागात पदयात्रेद्वारा मंतदारांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांशी संवाद साधत त्यांनी स्थानिक समस्या सोडविण्याबरोबरच या भागातील मुलं, मुलींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करणार असल्याची माहिती दिली. रविवारी सकाळी मनीष आनंद (manishanada) यांच्या पदयात्रेला वडारवाडी येथून सुरुवात झाली,शिवा ग्रुप,जय मित्र मंडळ,महाले नगर, मांजाळकर चौक मार्गे पीएमसी कॉलनी येथून गुंजाळकर कॉलनी येथे पदयात्रेचा समारोप झाला. यावेळी अजहर शेख, समद शेख यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी मनीष आनंद यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, याभागात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, शालाबाह्य मुलांचे प्रमाण अधिक आहे यामुळे या परिसरातील मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी  राज्य सरकारच्या मदतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करणार असल्याचे सांगितले आणि हे सेंटर स्थानिक मुलं, मुलींसाठी मोफत असेल असेही सांगितले.  तसेच जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी पुढाकार घेऊ असे सांगत  पुनर्विकासाचे फायदे स्थानिक नागरिकांना समजावून सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
29.2 ° C
29.2 °
29.2 °
78 %
3.2kmh
18 %
Wed
37 °
Thu
39 °
Fri
38 °
Sat
35 °
Sun
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!