34.5 C
New Delhi
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रश्री संत जगद्‌गुरु तुकाराम महाराज पालखीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले दर्शन

श्री संत जगद्‌गुरु तुकाराम महाराज पालखीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले दर्शन

पुणे : निवडुंगा विठोबा मंदिर येथे विसावलेल्या जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी आणि श्री निवडुंगा विठोबाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दर्शन घेतले.यावेळी आमदार श्रीमती माधुरी मिसाळ, ॲड. राहुल कुल, सिद्धार्थ शिरोळे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. विशाल मोरे, श्री निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थानचे विश्वस्त अरुण लक्ष्मण स्वामी, चंद्रकांत मिठापेल्ली, विशाल धनवडे, आशिष शहा आदी उपस्थित होते.(ashadhiwari)

पालखी दर्शनानंतर उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे पूजन केले. हा कुठल्याही व्यक्तीच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. हा आनंद अनुभवण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. जोपर्यंत वारीची परंपरा आहे तोपर्यंत भागवत् धर्माची पताका अशीच फडकत राहील. जोपर्यंत सूर्य-चंद्र असेल तोपर्यंत वारीची परंपरा अखंडित राहील.

पादुका दर्शनानंतर श्री निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थानच्यावतीने श्री. फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.

काल संगमवाडी येथे विसावा घेतल्यानंतर पालखी भवानीपेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर येथे मुक्कामासाठी दाखल झाली. आज पालखीचे भक्तिभावे दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. उद्या सकाळी पालखी पुढील मुक्कामासाठी कदम वाकवस्तीकडे (ता. हवेली) प्रयाण करेल.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त गोरख भिकुले, प्रमोद बेंगरुट आदी उपस्थित होते.श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे उद्या सकाळी सासवडकडे प्रस्थान होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
34.5 ° C
34.5 °
34.5 °
54 %
1.4kmh
10 %
Sun
34 °
Mon
35 °
Tue
37 °
Wed
32 °
Thu
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!