33.7 C
New Delhi
Wednesday, August 6, 2025
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ वारकऱ्यांना  'जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2025' प्रदान

ज्येष्ठ वारकऱ्यांना  ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2025’ प्रदान

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचा उपक्रम

पुणे : हाती भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन अन हातात टाळ – मृदुंग घेत वैष्णवांचा मेळावा आज पुण्य नगरीत दाखल झाला. या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज विश्वभूषण डॉ.  बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने वारकरी संप्रदाय, सामाजिक, कला, संत सेवेकरी, भजन – कीर्तन गायन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वारकऱ्यांना ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2025’ देवून सन्मानित करण्यात आले.

यामध्ये कुसुमताई बलभीम डमाल (भजनी गायिका, औधरोड), विनायक साळुंके यांना मरणोत्तर (श्रीमती सुलोचनाताई विनायक साळुंके यांनी पुरस्कार  स्वीकारला), भरत रामचंद्र गायकवाड (दत्त सेवक बोपोडी), ह. भ. पं.  संतोष रुद्रया स्वामी (विजेकरी बोपोडी) ह. भ. प. रवि वसंत जावीर ( तबला वादक) यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष उमेश मोरे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पालखी विसावा बोपोडी, मेट्रो स्टेशन जवळ आज (शुक्रवार, दि. 20 जून) ) पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यास  आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी ननगरसेवक सनी निम्हण, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, विश्वभूषण डॉ.  बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

दरम्यान, यावेळी विश्व भूषण डॉ.  बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती व निसर्ग उपचार केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पालखीत सहभागी झालेल्या थकलेल्या वारकऱ्यांसाठी मोफत मालिश सेवा प्रदान करण्यात आली. शेकडो  वारकऱ्यांनी या मालिश सेवेचा लाभ घेतला. याप्रसंगी स्थानिक भजनी मंडळींनी अभंग, कीर्तन, भजने सादर केली, तसेच प्रसिद्ध गायक- संगीतकार स्वरूप भाळवणकर यांनी त्यांचे नुकतेच प्रदर्शित झालेले विठ्ठल नामात होऊनिया दंग गीत सादर केले. कार्यारामच्या निमित्ताने उभारलेली विठ्ठलाची 30 फूटी मूर्ती आकर्षणाचा विषय ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वभूषण डॉ.  बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे सचिव दीपक म्हस्के यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
33.7 ° C
33.7 °
33.7 °
58 %
2.6kmh
100 %
Wed
34 °
Thu
38 °
Fri
39 °
Sat
31 °
Sun
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!