17.1 C
New Delhi
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रतात्याराव भिडे यांचा पुतळा होणार

तात्याराव भिडे यांचा पुतळा होणार

ब्राह्मण समाजाचा इतिहास चिरकाल टीकावा


पुणे –
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने, आज पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले , chief Engineer श्री युवराज देशमुख यांची भेट घेऊन महात्मा फुले स्मारक (पूर्वीचा भिडे वाडा) येथे, तात्याराव भिडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा व त्यांनी केलेल्या त्यागाचा इतिहास फलक स्वरूपात मांडण्यात यावा अशी मागणी करण्यात आली, ही मागणी प्रोजेक्ट च्या प्लॅन मध्ये समाविष्ट करण्यात आली व वर्षभरात तिथे पुतळा उभारण्यात येईल याची खात्री देण्यात आली तसेच या प्रकल्पातील पुतळा पूर्णत्वासाठी आवश्यक वाटल्यास अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या टीम चे सहकार्य घेण्यात येईल.

पुणे महानगरपालिका येथे झालेल्या बैठकीला जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ केतकी कुलकर्णी, ब्रह्मद्योग आघाडी अध्यक्ष अमोघ पाठक, उपाध्यक्ष विकास अभ्यंकर, जिल्हा सरचिटणीस राहुल जोशी, कोथरूड शाखा महिला आघाडी अध्यक्ष सौ जयश्री घाटे उपस्थित होते.

ब्राह्मण समाजाचा इतिहास चिरकाल टीकावा, अस्तित्व अबाधित रहावे यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे यशस्वी पाऊलात रूपांतर झाले असे म्हणता येईल.

ब्राह्मण समाजाच्या हक्कासाठी लढणारी संघटना
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
तात्याराव भिडे यांनी समाजाचा विरोध झुगारून आपला राहता वाडा (भिडे वाडा पुणे) देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करण्यासाठी महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दिला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
67 %
0kmh
0 %
Thu
22 °
Fri
27 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!