26.3 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्र'दगडूशेठ' गणपतीच्या दर्शनाला 'मंगलमुखी' तृतीयपंथी 

‘दगडूशेठ’ गणपतीच्या दर्शनाला ‘मंगलमुखी’ तृतीयपंथी 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; अलंकारांनी सजून पारंपरिक वेशभूषेत केली तृतीयपंथीयांनी श्रीं ची आरती

पुणे : सामान्य स्त्री-पुरुषांप्रमाणेच समाजातील महत्त्वाचा मात्र बाजूला असलेला घटक म्हणजे तृतीयपंथी. गणपती बाप्पाच्या भेटीची ओढ जशी सामान्य भक्ताला असते, तशी या तृतीयपंथींच्या मनातील बाप्पाच्या भेटीची ओढ आज दगडूशेठ गणपतीसमोर पहायला मिळाली. विविधांगी अलंकारांनी सजून आपल्या पारंपरिक वेशभूषेत तृतीयपंथीयांनी दगडूशेठ गणपतीचे मनोभावे दर्शन घेत आरती केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे १३२ व्या वर्षी आयोजित गणेशोत्सवात गणेश पेठेतील मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट मधील तृतीयपंथीयांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही किन्नर परिवार दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आला आहे. भारतामध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न मोठा आहे. त्यामुळे याकरिता आम्ही बाप्पा चरणी प्रार्थना केली आहे की बाप्पाने त्यांना संरक्षण कवच द्यावे. दरवर्षी आम्हाला आरतीचा मान मिळतो आहे, तो दरवर्षी मिळत रहावा, अशी इच्छा किन्नर परिवारातर्फे व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
26.3 ° C
26.3 °
26.3 °
92 %
4.8kmh
100 %
Mon
31 °
Tue
34 °
Wed
36 °
Thu
33 °
Fri
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!