32.5 C
New Delhi
Wednesday, July 30, 2025
Homeमहाराष्ट्रदापोडी मध्ये आमदार अण्णा बनसोडे यांची पदयात्रा

दापोडी मध्ये आमदार अण्णा बनसोडे यांची पदयात्रा

लाडक्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती

पिंपरी, _ राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी बुधवारी (दि. 6) दापोडी परिसरात पदयात्रा काढली. या पदयात्रेमध्ये लाडक्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती होती. अण्णा बनसोडे यांना पुन्हा एकदा पिंपरीचे आमदार करण्यासाठी दापोडी मधील सर्व लाडक्या बहिणी सरसावल्या.

दापोडी येथे महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. यावेळी आमदार अमित गोरखे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, उमेश चांदगुडे, इरफान सय्यद, माई काटे, चंद्रकांता सोनकांबळे, सुजाता पालांडे, नंदू कदम, शितल हगवणे, शेखर काटे, संजय अवसारमल संजय काटे, राजू बनसोडे, कविता अल्हाट, सुप्रिया काटे, सिकंदर सूर्यवंशी, गंगा धेंडे, संतोष काटे, प्रणव गायकवाड, हर्षल मोरे, ज्ञानेश्वर कांबळे, अविनाश काटे, कुणाल लांडगे, विशाल वाळुंजकर, आनंद ओव्हाळ, सुवर्णा कुटे, सरिता साने, तसेच आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दापोडी गावठाण येथे भव्य हार घालून आमदार अण्णा बनसोडे यांचे स्वागत करण्यात आले. फिरंगाई देवीच्या आरतीने पदयात्रेला सुरुवात झाली. दरम्यान अण्णा बनसोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. साई बाबा, विठ्ठल मंदिर आणि इतर मंदिरांना भेटी दिल्या. तसेच माजी नगरसेवक संजय नाना काटे, चंद्रकांता सोनकांबळे, सिकंदर सूर्यवंशी, अकील शेख, संजय औसरमल, सुप्रिया काटे, संतोष काटे, सत्यवान काटे, ऋषभ काटे, सुहास काटे, अस्मिता कांबळे व इतर पदाधिकाऱ्यांच्या घरी अण्णा बनसोडे यांनी भेटी दिल्या.

सिद्धार्थ नगर, नरवीर तानाजी पुतळा, पवार वस्ती, एसएमएस कॉलनी, आत्तार वीटभट्टी, महाविहार, काची वाडा, फुलेनगर, बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, खालची आळी, विठ्ठल मंदिर, समर्थ व्यायाम शाळा, शिवम मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, वरची आळी विठ्ठल मंदिर, 11 नंबर बस स्टॉप, मंत्री कॉम्प्लेक्स, सुंदरबाग, गणेश गार्डन या मार्गावरून पदयात्रा काढली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
32.5 ° C
32.5 °
32.5 °
60 %
4.8kmh
97 %
Wed
33 °
Thu
30 °
Fri
36 °
Sat
35 °
Sun
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!