31.2 C
New Delhi
Wednesday, September 10, 2025
Homeमहाराष्ट्रदीपक टिळक यांच्या जाण्याने टिळक घराण्याच्या तेजस्वी परंपरेचे विचारवंत प्रतिनिधित्व हरपले!

दीपक टिळक यांच्या जाण्याने टिळक घराण्याच्या तेजस्वी परंपरेचे विचारवंत प्रतिनिधित्व हरपले!

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी टिळक कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

पुणे, : लोकमान्य टिळकांचे पणतू, ‘केसरी’ वृत्तपत्राचे विश्वस्त व संपादक तथा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक जयंतराव टिळक यांच्या दुःखद निधनाबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी टिळक कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली व या कठीण प्रसंगी कुटुंबियांना धैर्याने उभे राहण्यासाठी प्रोत्साहित केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “टिळक घराण्याच्या तेजस्वी परंपरेचे ते प्रभावी आणि विचारवंत प्रतिनिधी होते. शिक्षण, पत्रकारिता व समाजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान अनुकरणीय आहे. ‘केसरी’ चे संपादक म्हणून त्यांनी लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रहितवादी विचारधारेला आधुनिक समाजात अर्थपूर्ण पद्धतीने पेरले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण, मूल्य आणि संस्कारांची दिशा दिली.”

त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक प्रतिभाशाली विचारवंत, कुशल प्रशासक आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व गमावले असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

या दुःखद प्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी टिळक कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या व ईश्वराने या कठीण काळात कुटुंबियांना धैर्य द्यावे, अशी प्रार्थना केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
31.2 ° C
31.2 °
31.2 °
67 %
4.5kmh
7 %
Wed
36 °
Thu
36 °
Fri
37 °
Sat
37 °
Sun
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!