अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे शिष्टमंडळाने, आज परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री आशिष दामले सर यांची पुणे येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
शासनाने नुकत्याच महामंडळावर सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या व अधिकृतपणे मंडळाचे कामकाज सुरू झाले.
या सर्व पार्श्वभूमीवर कॅप्टन आशिष दामले यांनी तत्परतेने केलेला शासनदरबारी पाठपुरावा, कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन एका नव्या अध्यायाची सुरवात झाली असे म्हणता येईल.
यासाठी पुणे टीम व प्रदेश टीमच्या वतीने श्री आशिष दामले यांचा सन्मान करण्यात आला.
आज झालेल्या चर्चेदरम्यान ब्राह्मण समाजासाठी असलेल्या अनेक उपयुक्त योजना याची माहिती देण्यात आली. यामध्ये 10 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज, 15 लाखाच्या व्यवसाय कर्जासाठी व्याज परतावा, महिलांसाठी बचतगट अशा अनेक ब्राह्मण समाजपयोगी योजनांचा समावेश आहॆ.
या सर्व अधिकृत योजना ब्राह्मण समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी व लाभार्थी बनवून त्याचा आपल्या समाजाला योग्य उपयोग करुन देण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महत्वाची भूमिका बजावणार आहॆ असे आश्वासन आज पुणे जिल्हा शिष्टमंडळाने श्री दामले यांना दिले.
यासाठी आवश्यक सर्व्हे, डाटा संकलन करण्यास शासनाच्या या कामात महासंघ मदत करेल असे सांगण्यात आले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी समाजाचे अविभाज्य घटक असलेल्या शिक्षक, युवकांच्या उच्च शिक्षणासाठीच्या व पुरोहित (गुरुजी) यांच्या प्रगतीसाठी असलेल्या आवश्यक योजना महामंडळाच्या कामकाजात समाविष्ट करण्यात याव्या अशी विंनती करण्यात आली, महामंडळाच्या वतीने या योजना टप्प्या टप्प्याने समाविष्ट करण्यात येतील असे सांगण्यात आले.
एकंदरीत आजची बैठक अतिशय सकारात्मक व एक नवी दिशायुक्त झाली.
आजच्या बैठकीला पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, प्रदेश सरचिटणीस सौ वृषाली शेकदार, प्रदेश उपाध्यक्ष विजय शेकदार,वडगाव शेरी शाखा अध्यक्ष श्रीकांत क्षीरसागर, उपाध्यक्ष किरण काळे, कोथरूड शाखा सरचिटणीस सुरेश कुलकर्णी, पेठ शाखा अध्यक्ष विकास कुलकर्णी, वारजे शाखा उपाध्यक्ष हेमंत कासखेडीकर उपस्थित होते.