9.1 C
New Delhi
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रपीएमपीएमएल चे १७४८ बदली कर्मचारी अखेर कायम…!!

पीएमपीएमएल चे १७४८ बदली कर्मचारी अखेर कायम…!!

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला होता निर्वाणीचा इशारा

पुणे- पी एम पी एम एल च्या बदली कर्मचाऱ्यांना सेवेत नियमीत सामावून घेण्यासाठी, आवश्यक असलेला २४० दिवसांचा कालावधी पुर्ण होवून सुद्धा, पीएमपीएमएलच्या प्रशासनाकडून सेवेत पुर्णत: समावून न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना आज शिवसेना शहर प्रमुख प्रमुखांना भानगिरे यांनी पीएमपीएमएल प्रशासनाला दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर आज अखेर 1748 पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येण्याबाबतचा आदेश पीएमपीएमएल च्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यांनी काढला आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने पुणे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडून याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. नियमित करण्याचा आदेश निघाल्याने पी एम पी एम एल चे बदली कर्मचाऱ्यांना आता कायम करण्यात येणार आहे.
पीएमपीएमएल च्या कर्मचारी सेवाशर्तीनुसार कर्मचाऱ्यास नोकरीत नियमीत होण्याआधी २४० दिवस बदली कर्मचारी म्हणून सेवा बजवावी लागते.सदर कालावधीत कर्मचाऱ्याचे कामातील सातत्य प्रगती बघुन त्यास सेवेत कायम करणेबाबत निर्णय घेतला जातो.त्यानुसार २४० दिवसांचा कालावधी समाप्त होवून देखील पी.एम.पी.एम.एल प्रशासनाने वाहक चालक आणि अन्य संवर्गातील एकुण सुमारे 1748 कर्मचारी नियमीत केले नव्हते.सदर कर्मचारी रोजदांरी पद्धतीने कार्यरत होते‌ नियमित कर्मचाऱ्यांच्या इतकेच काम करुन सुद्धा सेवेची निश्चिती नसल्याने कर्मचारी सातत्याने आंदोलनाच्या पावित्र्यात होते
या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यात यावे,यासाठी गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षातर्फे पी.एम.पी.एम.एल.प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता‌ ‌दरवेळी प्रशासनाकडून आश्वासन देण्यात येत असले तरी प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येत नव्हती. पी. एम.पी.एल प्रशासन दाद देत नसल्याने पक्षातर्फे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्या नेतृत्वात पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी संप देखील पुकारण्यात आला होता, आज आदेश न निघाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचे देखील प्रशासनास सांगण्यात आले होते,अखेर आज पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ यांनी कर्मचाऱ्यांना नियमीत करण्याचे आदेश काढले. कर्मचाऱ्यांना नियमित केल्याबद्दल या कर्मचाऱ्यांनी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पी.एम.पी.एम.एल प्रशासनाने आज हा आदेश निर्गमित केला असून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे देखील मनापासून आभार मानतो. पी.एम.पी.एम.एल चे कर्मचारी कायम सेवेत रुजू होण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या सर्व संघटनांचे, पी एम पी एम एल कर्मचाऱ्यांचे ही आभार मानतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
9.1 ° C
9.1 °
9.1 °
81 %
1kmh
1 %
Tue
12 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!