येरवडा- येरवडा मेट्रो स्थानक प्रवासी सेवेत दाखल झाले. याप्रसंगी पुणे मेट्रोने दोन्ही मार्गिकांवर प्रवासी सेवेच्या वारंवारितेमध्ये वाढ केली आहे. सकाळी व सायंकाळी पुणे मेट्रोमध्ये जास्त गर्दी असण्याऱ्या वेळेमध्ये (सकाळी ८ ते सकाळी ११ व दुपारी ४ ते रात्री ८) दोन्ही मार्गिकांवरील (ॲक्वा व पर्पल) मेट्रोची वारंवारिता ७.५ मिनिटांवरून ७ मिनिटे करण्यात आली आहे. प्रवाश्यांसाठी दर ७ मिनिटाला ट्रेन उपलब्ध होणार आहे. वारंवारिता वाढल्यामुळे दोन्ही मार्गिकांवर ४ फेऱ्यांनी वाढ होणार आहे. या आधी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते जिल्हा न्यायालय या मार्गिकेवर एकूण ११३ फेऱ्या होत असत, तर दिनांक २१ ऑगस्ट २०२४ पासून ११७ फेऱ्या होणार आहेत. वनाझ ते रामवाडी या मार्गिकेवर एकूण ११४ फेऱ्या होत असत, तर दिनांक २१ ऑगस्ट २०२४ पासून ११८ फेऱ्या होणार आहेत.
कमी गर्दीच्या वेळात (सकाळी ६ ते सकाळी ८, सकाळी ११ ते दुपारी ४ आणि रात्री ८ ते रात्री १०) मेट्रोची वारंवारिता हे पूर्वीप्रमाणेच १० मिनिटांची असणार आहे.
या प्रसंगी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर यांनी म्हंटले आहे, “मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये व वारंवारित्यामध्ये वाढ झाल्याने प्रवाश्याना फायदा होणार आहे. प्रवाश्यांचा मेट्रो स्थानकांवरील विलंबकाळ (Waiting time) कमी होणार आहे. गर्दीच्या वेळेत दोन्ही मार्गिकांवर ८ फेऱ्यांची वाढ होऊन जास्त नागरिक मेट्रोतून प्रवास करू शकतील”.
पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये आणि वारंवारितेमध्ये वाढ
RELATED ARTICLES
New Delhi
smoke
11.1
°
C
11.1
°
11.1
°
71 %
3.1kmh
0 %
Wed
20
°
Thu
22
°
Fri
23
°
Sat
25
°
Sun
25
°


