पुणे-पुणेकरांचा मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मेट्रो प्रशासनाकडून पुणेकरांसाठी नवनवीन सुविधा देखील देण्यात येत आहे. पुण्यामध्ये लवकरच भुयारी मेट्रो धावणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. जुलै अखेरीस मेट्रोचे हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर मेट्रो धावणार आहे.
पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानचा मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांचा मेट्रो प्रवास आणखी सुखकारक होणार आहे. सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी या मार्गावर मेट्रोसेवा सुरू करण्याचे महामेट्रोने नियोजन केले आहे.
पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावर बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्थानके आहेत. हा भूयारी मार्ग ३.६४ किलोमीटरचा आहे. या भुयारी मार्गावर मेट्रोची चाचणी फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली. या चाचणीमध्ये मुठा नदीच्या पात्राखालून सुमारे १३ मीटरपर्यंत पहिल्यांदाच मेट्रो धावली होती. यातील जिल्हा न्यायालय स्थानक ते बुधवार पेठ स्थानक मार्ग मुठा नदीपात्राच्या खालून जातो. त्यामुळे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे नदीपात्राखालून मेट्रो धावणार आहे.
पुण्यामध्ये लवकरच भुयारी मेट्रो धावणार
भुयारी मेट्रो मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण
RELATED ARTICLES
New Delhi
few clouds
25.3
°
C
25.3
°
25.3
°
79 %
3.2kmh
18 %
Sun
31
°
Mon
31
°
Tue
35
°
Wed
37
°
Thu
37
°