मुंबई – लोकलची चाचणी सुरू होती. मात्र ती अयशस्वी झाली. लोकल घसरली त्याठिकाणी ब्लॉक घेऊन दुरुस्ती करण्यात आली होती. त्याच्यानंतर त्या रुळावरून एक रिकामी लोकल चालवून पाहण्यात आली. मात्र ती घसरली, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथे पुन्हा लोकल रुळावरून घसरल्याची घटना बुधवारी दुपारी ४.१३ च्या सुमारास घडली. गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. तसेच सध्या हार्बर मार्ग ठप्प झाला आहे. हार्बर मार्गावरील सीएसएमटी – वडाळा रोड दरम्यान लोकल बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना सीएसएमटी आणि कुर्ला दरम्यान अप आणि डाऊन दिशेने मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
New Delhi
mist
8.1
°
C
8.1
°
8.1
°
93 %
1.5kmh
0 %
Wed
13
°
Thu
21
°
Fri
23
°
Sat
24
°
Sun
24
°


