21.1 C
New Delhi
Monday, October 27, 2025
Homeमहाराष्ट्रपेशवा युवा मंचचा सामुदायिक व्रतबंध सोहळा — परंपरेचा उत्सव!

पेशवा युवा मंचचा सामुदायिक व्रतबंध सोहळा — परंपरेचा उत्सव!

पंढरपूर-
पेशवा युवा मंचच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी सामुदायिक व्रतबंध सोहळा गुरुवार दिनांक १ मे २०२५ रोजी संपन्न झाला . यावेळी २५ बटूंनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता .
येथील आरती मंडप प्रांगण येथे आयोजिलेला हा व्रतबंध सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक बटूस मंचतर्फे सोवळे, उपरणे, पळी, पेला, ताम्हण व संध्येची पोथी भेट देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.श्री. मदन महाराज हरिदास होते. याप्रसंगी मुंबई येथील मंत्रालयातील राजपत्रित अधिकारी डॉ.सौ. मंजुषाताई कुलकर्णी व जयवंत शुगर, धावरवाडी चे अध्यक्ष श्री सि. एन. देशपांडे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे.पेशवा युवा मंचाच्या विविध समाजपयोगी कार्यक्रमांपैकी हा एक स्तुत्य उपक्रम आहे.अशी प्रशंसा मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली. संस्कृती रक्षण करणे हे आजच्या काळात एक आव्हान होऊन बसले आहे .अशा काळात संस्कृती रक्षणाचे कार्यक्रम हे कौतुकास्पदच आहे असे गौरवोद्गार सौ.मंजुषाताई कुलकर्णी यांनी काढले.मुंजीचे पौरोहित्य श्री आकाश पारनेरकर गुरुजी व श्री विठ्ठल रुक्मिणी वेदपाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी बटूंना शुभ आशीर्वाद देण्यासाठी श्री सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री प्रशांतराव परिचारक, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, रतनचंद शहा बँकेच्या शाखाधिकारी सौ. माधुरीताई बडवे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ.ऋजुता उत्पात ,श्री केटर्सच्या सौ. मंजिरी परिचारक, रेणुका प्रतिष्ठानच्या संस्थापिका सौ. प्रियांका देशपांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी स्वा.सावरकर पथावरून बटूंची सवाद्य ,भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष श्री ज्ञानराज बेणारे , उपाध्यक्ष श्री. मंगेश कवडे यांसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
21.1 ° C
21.1 °
21.1 °
78 %
1kmh
0 %
Sun
26 °
Mon
31 °
Tue
30 °
Wed
32 °
Thu
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!