26 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रफ्रँन्क्स हॉट डॉग्सचा फ्रॅनग्लोबलशी भागीदारीतून भारतातील आपल्या पहिल्या आऊटलेटचे केले अनावरण

फ्रँन्क्स हॉट डॉग्सचा फ्रॅनग्लोबलशी भागीदारीतून भारतातील आपल्या पहिल्या आऊटलेटचे केले अनावरण

पुणे, : जागतिक पातळीवर प्रसिद्ध झालेला फ्रँन्क्स हॉट डॉग्स या गुर्मेट हॉट डॉग्स ब्रँडने भारतात अधिकृतरीत्या प्रवेश केला आहे! फ्रँचायझी इंडियाचा आंतरराष्ट्रीय फ्रँचायझी विकास शाखा असलेल्या फ्रॅनग्लोबलशी भागीदारी करून या ब्रँडने भारतातील आपल्या पहिल्या आऊटलेट चिचंवड येथील एल्प्रो सिटी स्क्वॅअर या मॉलमध्ये हे आऊटलेट सुरु झाले आहे.या ऐतिहासिक आरंभाने या ब्रँडचा केवळ भारतीय बाजारपेठेत प्रवेश झालेला नाही, तर फ्रँन्क्स च्या भारतातील महत्त्वाकांक्षी वाढीसाठी पुण्यालाही लाँच पॅडचे स्थान मिळाले आहे. गतिमान खवय्येगिरी आणि साहसी खवय्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तसेच स्थानिक चवीसह जागतिक आकर्षण यांचा मिलाफ झालेल्या पुण्यात फ्रँन्क्स हॉट डॉग्सला आपले नाविन्यपूर्ण, चवदार मेनू सादर करण्यासाठी परिपूर्ण वातावरण उपलब्ध होणार आहे.प्रमुख पदार्थ हॉट डॉग्स , क्रिस्पी चिकन पॉप्स, ग्रिल्ड चीज आणि तजेलदार पेये यांच्या वैविध्यपूर्ण मिलाफाने बनलेला फ्रँन्क्स हॉट डॉग्स पुणेचा मेनू शहरातील खवय्यांना आकर्षित करणारा ठरणार आहे. अभिजात फ्लेवर्सपासून भारतीय मसाल्यांनी नटलेल्या नावीन्यपूर्ण ट्विस्ट्सपर्यंत येथील पदार्थ हे अन्य कुठेही मिळणार नाही असा अनुभव देणारे ठरतील.हा आरंभ म्हणजे या वर्षीच्या सुरूवातील फ्रँचाईझ फेअरमध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या मास्टर फ्रँचायझी करारात मान्यता देण्यात आलेल्या एका महत्त्वाकांक्षी विकास योजनेची केवळ सुरूवात आहे. फ्रँन्क्स हॉट डॉग्स आणि फ्रॅनग्लोबल यांचे पुढील पाच वर्षांत भारतभरात ३०० आऊटलेट्स उघडण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील १०० ठिकाणी पुढील १८ महिन्यात सुरूवात होईल.

फ्रँन्क्स हॉट डॉग्सचे सीईओ बेंजामिन ॲटल उत्साहाने म्हणाले की ,भारत ही एक गतिमान बाजारपेठ असून येथे प्रयोगशील खाद्याच्या अनुभवासाठी गहिरे प्रेम आहे. फ्रॅनग्लोबलशी आमच्या भागीदारीमुळे अव्वल दर्जा आणि सर्जनशीलतेचा फ्रँन्क्सचा वारसा आम्हाला या नवीन उत्साहवर्धक लोकांपर्यंत आणता येईल. पुण्यासारख्या गतिमान शहरातून त्याची सुरूवात होत आहे.या भागीदारीला स्थानिक तज्ज्ञतेची भर घालत फ्रँन्क्स हॉट डॉग्सचे पुणे एरिया डेव्हलपर्स संकेत वाघमारे आणि श्वेता वाघमारे म्हणाले, पुण्याचा वैविध्यपूर्ण आणि खाद्यप्रेमी वर्ग हा फ्रँन्क्सच्या प्रयोगशील पदार्थांशी पूर्णपणे सुसंगत आहे. जागतिक पातळीवरच्या या प्रसिद्ध ब्रँडला आपल्या शहरात घेऊन येताना आम्ही रोमांचित आहोत. पुणेकर प्रेमात पडतील असा फास्ट-कॅज्युअल खाद्यानुभव निर्माण करण्याची आम्हाला आशा आहे.पुण्यातील आऊटलेटचा आरंभ हा फ्रँन्क्स च्या जागतिक विस्तार धोरणातीलही एक मैलाचा दगड आहे. बेल्जियम, स्विट्झर्लंड, नेदरलँडमधील नवीन आऊटलेट्स आणि २०२४ च्या शेवटापर्यंत फ्रान्समधील आठ ठिकाणे यांचा त्यात समावेश आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
26 ° C
26 °
26 °
93 %
3.9kmh
100 %
Mon
31 °
Tue
34 °
Wed
36 °
Thu
33 °
Fri
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!