28.4 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्रबोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयितांना अटक

बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयितांना अटक

पुणे -बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे पोलिसांना अखेर यश आलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तीन पैकी एका तरुणाला अटक केलेली असून इतर दोन जणांचा कसून शोध घेतला जातो आहे.सीसीटीव्हीची मदत घेऊन पीडित तरुणांच्या मित्राला जेव्हा सीसीटीव्ही दाखवण्यात आला तेव्हा त्याने हाच आरोपी असल्याचे सांगितले आणि यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटक केलेली असून इतर दोन जणांच्या पोलीस सध्या शोध घेत आहेत. मात्र, पुणे पोलिसांकडून या संपूर्ण घटनेबद्दल गोपनीयता बाळगण्यात असल्यामुळे अधिकृतपणे कुठलाही वरिष्ठ अधिकारी यासंदर्भात अद्याप बोलायला तयार नाहीत. पुणे पोलिसांनी मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दुपारपर्यंत या संपूर्ण घटनेच्या संदर्भात आणखी मोठी एक अपडेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या 60 टीम पोलिसांनी तयार केल्या आहेत. 9 दिवसानंतरही आरोपी मोकाट फिरत असल्याने पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे सगळीकडून या घटनेचा आणि पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींचे स्केच तयार केले आहेत. शिवाय आरोपीची माहिती देणाऱ्याला 10 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आल आहे. आतापर्यंत रेकॉर्डवरील 400 गुन्हेगारांची झाडझडती केली आहे.पोलिसांकडून आतापर्यंत रेकॉर्डवरील 400 गुन्हेगारांची झाडझडती केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात आली आहे. बोपदेव घाटापासून जाणाऱ्या 70 ते 80 किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही मिळवण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराइतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात नऊ दिवस उलटून गेले तरी पोलिसांना अजूनही आरोपींचा कुठलाही मागमूस लागत नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. शहर पोलिसांच्या तब्ब्ल 60 टीम वेगवेगळ्या दिशेने या आरोपींचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक डाटा यांच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, मोबाईल फोनला रेंज नसलेला परिसर आणि तब्बल दहा किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली आहे. बोपदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला तीन संशयिताच एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटना घडल्याच्या वेळेनंतर साधारण 15 मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असले असावेत असा संशय पोलिसांना आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
28.4 ° C
28.4 °
28.4 °
77 %
2.7kmh
21 %
Wed
38 °
Thu
40 °
Fri
38 °
Sat
36 °
Sun
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!