4.1 C
New Delhi
Thursday, January 15, 2026
Homeमहाराष्ट्रभोजनाची व्यवस्था आणि वैद्यकीय सेवा

भोजनाची व्यवस्था आणि वैद्यकीय सेवा

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे वारकरी सेवा

पुणे – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या माध्यमातून पुण्यात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या सेवेचा हजारो वारकरी मंडळींनी लाभ घेतला.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुण्यात आगमन झालं. दोन्ही पालख्या या दोन दिवस पुण्यात मुक्कामी असल्याने पुणेकरांनी मोठ्या उत्साहात पालख्यांचं स्वागत केल. पालख्यांसोबत असलेल्या वारकऱ्यांमुळे संपूर्ण शहरातील वातावरण हे भक्तीमय झाले आहे. विविध मंडळे, संस्था, संघटना यांच्याकडून या वारकऱ्यांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करण्यात येत आहे. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीनेही मंदिरापुढे वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनीही वारकऱ्यांना भोजन वाढून त्यांची सेवा केली.

दरम्यान, मुंबई येथील लिव्हर ट्रान्स्प्लान्ट स्पेशालिस्ट डॉ. कैलास जवाडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळयासोबत पुणे ते जेजुरीपर्यंत तर तुकोबांच्या पालखीसोबत पुणे ते अकलूजपर्यंत पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी त्यांच्याकडून मोफत वैद्यकीय सेवा आणि चरण सेवा (मॉलिश) केली जाते. त्यांच्यासाठी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या माध्यमातून आवश्यक ती औषधे उपलब्ध करुन देण्यात आली.


महाराष्ट्राला पंढरपूरच्या वारीची मोठी परंपरा आहे. लाखो वारकरी भक्ती-भावाने पालख्यांसोबत पंढरपूरला श्री विठुरायाच्या दर्शनासाठी पायी जात असतात. श्री विठ्ठलाच्या रुपातील या वारकऱ्यांची भोजन सेवा आणि त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी औषधं उपलब्ध करुन देण्याची संधी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ला मिळाली, हे आमचं परमभाग्य आहे.’’

पुनीत बालन
(विश्वस्त आणि उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
4.1 ° C
4.1 °
4.1 °
100 %
2.6kmh
100 %
Thu
21 °
Fri
23 °
Sat
24 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!