सोलापूर –
आगामी निवडणुकीच्या धरती वरती मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thakre हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांचे स्वागत मनसे नेते दिलीप धोत्रे Dilip dhotare यांनी केले.
राज ठाकरे यांचे सोलापूर Solapur जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर शहराच्या बॉर्डरवरती भीमानगर पासून टेंभुर्णी, माढा, मोडनिंब, मोहोळ, लांबोटी ,पाकणी, सोलापूर पुणे नाका व शहर आदी ठिकाणी राज ठाकरे यांचे मनसेवकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी त्यांच्या समवेत मनसे नेते बाळा नांदगावकर ,अविनाश अभ्यंकर, बाबू वागस्कर, विनोद शिंदे,हे नेते त्यांच्या समवेत आहेत. यावेळी मनसेचे नेते
दिलीप धोत्रे, जैनुद्दीन शेख ,प्रशांत इंगळे, विनायक महिंद्रकर. प्रशांत इंगळे, अमर कुलकर्णी, एड. कैलास खडके. आधी सह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्या इच्छुकांनी रात्री उशिरापर्यंत राज ठाकरे यांच्या गाठीभेटी घेत आपला प्रवेश निश्चित करून घेतला आहे. काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे, तर काही ना आज सकाळी प्रवेशाची वेळ देण्यात आली आहे . सोलापूर शहरातील दिग्गज नेत्यांच्या प्रवेशामुळे मनसेची ताकद आणखीनच वाढणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.
तब्बल तीन वर्षानंतर राज ठाकरे यांनी सोलापूरचा दौरा केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सोलापुरात जंगी स्वागत
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
28
°
C
28
°
28
°
34 %
2.2kmh
0 %
Fri
28
°
Sat
31
°
Sun
33
°
Mon
33
°
Tue
33
°