पुणे, – : माजी विद्यार्थी मेळावा हा केवळ एक कार्यक्रम नाही तर भूतकाळातील आठवणींना उजाळा देण्याची संधी असते. हे लक्षात घेऊन शिवणे येथील नवभारत हायस्कूल मध्ये ३० वर्षानंतर १९९४ ते ९५ या काळातील शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहसंमेलन नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब कोरेकर, सर्व विद्यार्थ्यांचे लाडके गाढवे व पवार सर, कामठे, गुरव, शेजवळ मॅडम व कोरेकर मॅडम असे २५ माजी शिक्षक उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक खोपडे उपस्थित होते. तसेच यावेळी २०० विद्यार्थी सोहळ्याला उपस्थित होते.
या कार्यक्रमात सर्व माजी शिक्षकांचा सन्मान विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आल. तसेच नवीन शैक्षणिक वर्षात विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शंभर शाळेच्या बॅग देण्याचे नियोजन आखण्यात आले. आज आम्ही जे काही आहोत ते केवळ शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे आहोत अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे नियोजन १९९४-९५ चे माजी विद्यार्थी राहुल कार्ले, शशिकांत लंगे, विलास मोरे, राजश्री गुरव, राहुल गोरे, सागर कदम, हेमंत टक्के, नवनाथ पोटावडे, अतुल धावडे पाटील, सोमनाथ वाल्हेकर आणि प्रतिभा चतुर यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना शशिकांत लंगे यांनी केले. सूत्रसंचालन विलास मोरे व आभार राजश्री गुरव यांनी कले
मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सांगितले की, नवभारत हायस्कूल येथे मिळणारे शिक्षण, संस्कृती आणि आचरण मानवी आणि तांत्रिक गुणांचा विकास करते. आज आपण जे काही आहोत ते येथे मिळालेल्या शिक्षणामुळेच आहोत. तसेच माजी विद्यार्थ्यांनी हायस्कूलचे सध्याच्या विद्यार्थ्यांना यश मिळविण्याच्या युक्त्या सांगितल्या. त्यांच्या विद्यार्थी जीवनातील अनुभव सांगितले, मुलांना यशस्वी होण्याचे मार्ग सांगतांना त्यांनी उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लावली हजेरी
विद्यार्थी म्हणालेः मी जे काही आहे ते नवभारत हायस्कूलकडून मिळालेल्या शिक्षणामुळे
RELATED ARTICLES
New Delhi
broken clouds
31.3
°
C
31.3
°
31.3
°
47 %
1.5kmh
83 %
Sat
33
°
Sun
37
°
Mon
32
°
Tue
36
°
Wed
30
°