पुणे -दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही शिवाजी नगर येथील यूईआय ग्लोबल हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज मध्ये आज विद्यार्थ्यांनी आणि शेफ यांनी मिळून चेट्टीनाड फूड फेस्टिव्हल चे आयोजन केले होते. तामिळनाडू भागातील चेट्टीनाड थीम या वेळेस फूड फेस्टिव्हल मध्ये होती.प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांनी स्वतः च्या हाताने बनविलेले विविध पदार्थ आपल्या पालकांना आणि पाहुण्यांना बनवून दिले आणि त्याचा त्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. चेट्टीनाड प्रांतातील विविध व्यंजन या वेळी तयार करण्यात आले होते. या मध्ये स्टार्टर मध्ये कोला उरूंडा, परप्पू रस्सम, मेन कोर्स मध्ये चिकन चेट्टीनाड, पलकट्टी चेट्टीनाड, कॅबेज पोरीयाल, राईस पापड, बीटरूट रायता, टॉमेटो राईस, पुरी आणि डेझर्ट मध्ये सेवय्या प्यासम असे चविष्ट पदार्थ या फूड फेस्टिव्हल साठी आलेल्या पाहुण्यांना चाखता आले. महाविद्यालयाचे शिक्षक,शेफ यांच्या मार्गदर्शनाखाली या फूड फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात आले होते. या फूड फेस्टिव्हल मध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या वेळेस यूईआय ग्लोबल हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज चे व्यवस्थापकीय संचालक श्री. मनीष खन्ना, उपसंचालिका सौ. वैशाली चव्हाण,अॅकॅडमीक प्रमुख सौ.वसुधा पारखी, बकुल केटरिंग चे मालक श्री.राज गोला,पीएटो कैफे चे मालक श्री. स्मरण शेट्टी, कॉलेज मधील शेफ्स, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यूईआय ग्लोबल कॉलेज मध्ये चेट्टीनाड फूड फेस्टिवल चे आयोजन
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
27.3
°
C
27.3
°
27.3
°
88 %
3.7kmh
100 %
Mon
27
°
Tue
35
°
Wed
35
°
Thu
36
°
Fri
34
°