अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे पर्यावरण आघाडी, Green Thumb व नांदेड सिटी रहिवासी यांच्या संयुक्त विद्यमाने, रविवार 30 जून रोजी खानापूर गावातील खडकवासला बॅकवाटर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. वड, सागवान अशा जातीच्या वृक्षांची 40 पेक्षा जास्त रोपे लावण्यात आली.
मुलांना पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी यासाठी आवर्जून अनेक पालकांनी आपल्या मुलांना या उपक्रमात सहभागी करुन घेतले, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग जमेची बाजू ठरली.
केवळ झाडें लावणे हा उद्देश न ठेवता त्याच्या योग्य वाढीसाठी, झाडें टिकण्यासाठी वृक्ष दत्तक उपक्रम सुरू करण्यात यावा असे मत पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी मांडले. रोपे लावून झाल्यावर त्याची योग्य काळजी घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना, निसर्गाबाबत असलेले आपले दायित्व याचे महत्व पर्यावरण आघाडी अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.
यनिमित्त खानापूर गावातील दहावीत उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलींचा महासंघातर्फे गौरव करण्यात आला.आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनात भोसले मामा व जावळकर यांचा मोलाचा वाटा होता. सर्व परिवाराच्या वतीने 22 किमी धरणालगत च्या परिसरात गाळ काढुन त्यावर वृक्षांची, अदभूत निसर्गाची किमया साधणाऱ्या कर्नल सुरेश पाटील सर यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.मुलांनी मात्र आज पुस्तकातील धडे प्रत्यक्षात उतरवले व त्याचा आनंद घेतला.