28.6 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्रसामाजिक भान असणे देखील गरजेचे -अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील

सामाजिक भान असणे देखील गरजेचे -अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील

विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपयांचे शालेय साहित्य

पुणे : सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची सर्वत्र ओळख आहे. गणेशोत्सवासह विविध प्रकारचे उत्सव पुण्यामध्ये मोठया उत्साहाने साजरे होतात. त्या उत्सवासोबतच सामाजिक भान असणे देखील गरजेचे आहे. अखिल म्हसोबा उत्सव mhasoba ustav ट्रस्टतर्फे समाजातील प्रत्येक गरजवंत घटकासाठी मदतीचा हात देण्यात येत असून ही आदर्शवत बाब आहे, असे मत पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी व्यक्त केले.

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट च्या वतीने आयोजित म्हसोबा उत्सवात शहरातील गरजवंत विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपयांचे शालेय साहित्य प्रदान कार्यक्रम मंडईतील बुरूड आळी burud aali येथे पार पडला. यावेळी कोहिनूर उद्योग समूहाचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, भोला वांजळे, सुधीर साकोरे आदी उपस्थित होते. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल prakash dhariwal यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे.

कृष्णकुमार गोयल krushankumar goyal म्हणाले, विद्यार्थ्यांनी देखील मोठे झाल्यावर समाजातील गरजवंतांना मदत देण्याची शिकवण अशा उपक्रमांमधून मिळत असते. अनेक सामाजिक संस्था अशा प्रकारे कार्यरत असून अखिल मंडई म्हसोबा ट्रस्टतर्फे देण्यात येणारी मदत नक्कीच कौतुकास्पद आहे.

प्रास्ताविकात निवृत्ती जाधव म्हणाले, मागील ५ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातो. सुरुवातील १ हजार वह्यांपासून सुरु झालेला उपक्रम आज ३ हजार वह्या मदत म्हणून देण्यापर्यंत पोहोचला आहे. ट्रस्टच्या विश्वस्तांसह कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला अवांतर खर्च टाळून निधी जमा केला जातो. त्यातून शालेय साहित्य हे गरजवंत विद्यार्थ्यांना दिले जाते. याशिवाय उत्सवात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात, असेही त्यांनी सांगितले. उत्सवात अन्नदान सेवा, भजनी मंडळाचे कार्यक्रम, ढोल-ताशा वादन देखील सुरु आहे. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.

* दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव
रविवार, दिनांक ४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता मंडई बुरुड आळीतील मंदिरात दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प.पू. कालीपूत्र कालीचरण महाराज उपस्थित राहणार आहेत. फिरत्या रंगीबेरंगी दिव्यांची व फुलांची  आकर्षक आरास यानिमित्ताने  होणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
28.6 ° C
28.6 °
28.6 °
77 %
3.3kmh
37 %
Tue
29 °
Wed
38 °
Thu
40 °
Fri
38 °
Sat
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!