16.1 C
New Delhi
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रसुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड

सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड

ताई लोकसभेत तर वहिनी राज्यसभेत! बारामतीला तीन खासदार

बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांची अखेर राज्यसभेत बिनविरोध निवड झाली आहे. आज त्यांनी विधानसभेत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानतंर अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड झाली आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. परंतु, ३ वाजेपर्यंत सुनेत्रा पवारांशिवाय कोणाचाही अर्ज न आल्याने सुनेत्रा पवारांची बिनविरोध झाली. आज त्यांनी दुपारी विधानसभेत जाऊन उमेदवारी अर्ज भरला. महायुतीच्या वतीने भाजपाच्या कोट्यातून त्यांनी हा अर्ज भरला होता.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत हायव्होल्टेज सामना रंगला होता. मागील तीन टर्मपासून खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांना कुटुंबातूनच आव्हान देण्यात आलं होतं. सुळे यांच्या भावजय सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात होत्या. पण बारामतीकरांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्यावरच विश्वास टाकत त्यांना तब्बल १ लाख ५८ हजार मतांच्या फरकाने विजयी केले. राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच पराभवाचा धक्का बसल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असणार, याबाबत चर्चा सुरू असतानाच त्यांचे नाव राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत आले. मात्र राष्ट्रवादीतील इतर नेतेही या जागेसाठी इच्छुक असल्याने नक्की कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत सस्पेन्स होता. अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटची दिवशी आज हा सस्पेन्स संपला आणि राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आले.  बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनीमुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
16.1 ° C
16.1 °
16.1 °
67 %
0kmh
20 %
Thu
19 °
Fri
23 °
Sat
17 °
Sun
21 °
Mon
22 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!