पिंपरी-चिंचवड-: महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा ‘छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार २०२४-२०२५’ पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक मान्यवरांना प्रदान करण्यात आला. छावा प्रतिष्ठान, नवी मुंबई या संस्थेने २१ मे रोजी मराठी साहित्य मंदिर सभागृह, वाशी, नवी मुंबई येथे या पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन केले होते.
या पुरस्कारासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवडमधून क्रीडा क्षेत्रासाठी सुनील साठे, राजेंद्र कांबळे, विष्णुपंत पाटील, सुधा खोले आणि सुप्रिया यादव यांना सन्मानित करण्यात आले. पुणे शहरातील श्री. अजय कांबळे यांचाही यात समावेश होता.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पिंपरी-चिंचवडचे श्री. काळूराम लांडगे, डॉ. व नगरसेवक विश्वास गजरमल, आणि राहुल साळुंके यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच, शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुभाष माकर यांनाही ‘छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
प्रसिद्ध सिने अभिनेते संभाजी माने आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री कुमुदिनी अदाटे यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यामध्ये मनोज घोरपडे (आमदार उत्तर कराड), वैभव नाईक (युवा नेते), सरनोबत अमित दादा गाडे पाटील (छत्रपती संभाजी महाराज यांचे दूधभाऊ यांचे वंशज), सुभेदार कुणाल दादा मालुसरे (नरवीर सुभेदार तानाजी बाबा मालुसरे यांचे वंशज), सरसेनापती राजेंद्र मोहिते पाटील (सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज), सचिन दादा भोसले, विजय राऊत (ए.पी.आय. रायगड पोलीस) यांचा समावेश होता.
छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद डॉ. अमित गंडाकुंश यांनी या भव्य आणि दिव्य सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले.