पुणे – पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन, पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया फाऊंडेशन, आदर पूनावाला – क्लीन सिटी इनिशिएटीव्ह, एम.एन.जी.एल, के.पी.आय.टी आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी यांच्यामार्फत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त पेहेल-२०२६ या पुणे शहरातील सर्वांत मोठ्या ई-कचरा व प्लास्टिक कचरा जनजागृती व संकलन अभियानाचा उद्घाटन समारंभ आज कर्वेनगर येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवर आणि जागरूक नागरिकांनी संकलन केंद्रावर ई-कचरा दिला.

यावेळी या उद्घाटनाला पुणे मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त श्री. अविनाश सकपाळ, कमिन्स इंडिया फाऊंडेशनचे सीएसआर मॅनेजर श्री. दिपक बेट्टी, तसेच प्लास्टिक वेस्ट प्रोजेक्ट लीडर श्री. अनिल कुलकर्णी, केपीआयटी डायरेक्टर श्री. स्वप्नील देशमुख, पर्यावरण संरक्षण गतिविधीचे अनिलजी घळसासी, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सचीन कुलकर्णी, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशनच्या संचालिका सौ. अनुष्का कजबजे, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशनचे सीईओ डॉ. राजेश मणेरीकर आणि महालक्ष्मी रिसायकलर्सचे संचालक मनोज मेहता हे उपस्थित होते.


