पुणे : ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीत ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स येथे पदवीदान समारंभ संपन्न झाला.यावेळी अध्यक्ष सागर ढोले पाटील आणि सचिव उमा सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शालेय परिषदेच्या सदस्यांना पदवीदान समारंभात बॅज देऊन सन्मानित करण्यात आले.
आकाश, जल, पृथ्वी आणि अग्नि हाऊसच्या क्रीडा कर्णधार,शिस्त कर्णधार, संबंधित कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन यांना सन्मान म्हणून आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी पदव्या आणि बॅज देऊन अभिमानाने सजवण्यात आले.
शाळेच्या दैनंदिन दिनचर्येत शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक – शारीरिक – आरोग्य आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी प्रामाणिकपणा आणि आपलेपणाची वचनबद्धता व्यक्त करण्यासाठी शाळा परिषदेच्या सदस्यांनी शपथ घेतली.

संस्थेचे अध्यक्ष सागर ढोले पाटील यांनी शालेय परिषदेच्या सदस्यांना आशीर्वाद दिला,त्यांचे अभिनंदन केले आणि प्रत्येक विद्यार्थ्याला विचार करण्यास प्रेरित केले की एका नेत्याने सर्व शक्य मार्गांनी इतरांना मदत करण्याची १००% जबाबदारी कशी घ्यावी.कौन्सिल सदस्यांच्या कृतज्ञतेच्या भावनेने समारंभ संपन्न झाला.