’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, मंत्रालय कक्ष यांच्या वतीने “सन २०२५ ते २०२९ राष्ट्रीय सेवा योजना बृहद विकास आराखडा” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिरूर तालुक्यातील न्हावरे या गावचे सर्वेक्षण करून तयार केलेल्या ‘शास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रामीण विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ.पराग काळकर, राष्ट्रीय सेवा योजना राज्य संपर्क अधिकारी डॉ. मिलिंद काळे, राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रिय संचालक अजय शिंदे, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, प्रसनजित फडणवीस, महाविद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ नितीन घोरपडे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागाच्या शास्वत विकासासाठी हे पुस्तक उपयुक्त असून शास्त्रीय पद्धतीने ग्रामीण भागातील समस्या समजून घेऊन त्यावर विकास आराखडा तयार करता येईल असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
या पुस्तकामध्ये महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, पर्यावरण शास्त्र, पर्यटन, भूगोल, मानसशास्त्र, मराठी, वाणिज्य या विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी न्हावरे येथील विविध घटकांचे सर्वेक्षण करून त्याचे विश्लेषण करून अहवाल सदर पुस्तकात एकत्र केलेले आहेत. यामध्ये गावातील पाणी, प्राणी, वनस्पती, मृदा, शेती पध्दती, पर्यटन, पर्यावरण या घटकांचा अभ्यास केलेला आहे.
या पुस्तकाचे संपादन महाविद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ नितीन घोरपडे यांनी केले तर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले. प्रा. गणपत आवटी, प्रा. अपूर्वा बनकर, प्रा. विवेकानंद टाकळीकर संपादक मंडळात सदस्य म्हणून काम केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद काळे, सूत्रसंचालन अमित गोगावले यांनी केले तर आभार डॉ. सविता कुलकर्णी यांनी मानले.