5.1 C
New Delhi
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रमहानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिले जाणार शाळेच्या पहिल्याच दिवशी ‘शैक्षणिक किट’

महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिले जाणार शाळेच्या पहिल्याच दिवशी ‘शैक्षणिक किट’

‘ई-रुपी’ या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केले जाणार वितरण, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उपक्रम

पिंपरी, – : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसांपासूनच म्हणजेच १५ जून २०२५ पासूनच शैक्षणिक साहित्यांचा समावेश असणारे एक किट देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शैक्षणिक साहित्याचा अभाव असल्यामुळे अडचण येऊ नये, यासाठी लवकरात लवकर शैक्षणिक किटचे वितरण पूर्ण व्हावे, यादृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने शैक्षणिक किट वितरण प्रक्रिया ई-रुपी (e-Rupi) या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पूर्ण केली जाणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) उपक्रमांतर्गत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्यामध्ये ई-रुपी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सुरक्षित, रोखविरहित व्यवहार करून विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. या किटमध्ये यंदा पालक आणि शाळांकडून मिळालेल्या अभिप्रायाचा विचार करून काही नवीन वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक असणाऱ्या वस्तू या किटमध्ये आहेत.
मागील वर्षी ई-रुपी प्रणाली अंतर्गत ५१ हजार २०३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले होते. तर, यावर्षी बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

बालवाडीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार लाभ

यंदाच्या वर्षी बालवाडीच्या विद्यार्थ्यांनाही डीबीटी योजनेचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता बालवाडीतील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक किट मिळेल. या किटमध्ये टिफिन बॉक्स आणि चित्र काढण्यासाठी उपयुक्त असे रंग, यासारख्या नवीन वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शाळांमध्ये उशिरा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी १० जुलैपासून दुसऱ्या टप्प्यातील वितरण सुरू होणार आहे.
……
चौकट

अशी आहे ई-रुपी प्रक्रिया

  • ई-रुपी हे एक डिजिटल व्हाउचर असून यासाठी बँक खाते आवश्यक नाही
  • यामध्ये लाभार्थ्यांना एसएमएस द्वारे प्री-पेड क्युआर कोड व्हाउचर प्राप्त होते
  • हे व्हाउचर केवळ शाळा साहित्य खरेदीसाठीच वापरता येते
  • यासाठी फक्त १० अंकी वैध संपर्क क्रमांक आवश्यक
  • अतिरिक्त सुरक्षेसाठी ओटीपी द्वारे व्यवहार पडताळणी होते
    ………..
    कोट
    थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवसांपासूनच शैक्षणिक किटचे वितरण सुरू केले जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. डीबीटी यंत्रणेत सुधारणा करून आणि किटमध्ये उपयुक्त वस्तूंचा समावेश करून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी आमचे प्राधान्य आहे.
  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
    ……..
    कोट

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ई-रुपी आधारित डीबीटी प्रक्रियेद्वारे शैक्षणिक किटचे वाटप करण्यात येईल. विद्यार्थ्यांपर्यंत जलद, पारदर्शकपणे लाभ पोहोचवण्यासाठी ई-रुपी डीबीटी मॉडेल उपयुक्त ठरत आहे. यावर्षीच्या सुधारित प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या गरजा लक्षात घेऊन प्रक्रिया आणखी प्रभावी करण्यात आली आहे.

  • प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
    ……..
    कोट

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यादृष्टिने यावर्षी आम्ही डीबीटी प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण तांत्रिक सुधारणा केल्या आहेत. ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. या प्रक्रियेद्वारे करण्यात येणाऱ्या प्रत्येक किटचे वाटप ओटीपी पडताळणीद्वारे सुरक्षित, जलद पद्धतीने होणार आहे.

  • विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
5.1 ° C
5.1 °
5.1 °
93 %
1.5kmh
0 %
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!