29.5 C
New Delhi
Wednesday, September 10, 2025
Homeमहाराष्ट्रड्रीम वर्क्स रिअल्टर्सकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दीर्घकालीन बांधिलकीसह अनोखी वृक्षारोपण मोहीम

ड्रीम वर्क्स रिअल्टर्सकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दीर्घकालीन बांधिलकीसह अनोखी वृक्षारोपण मोहीम

पुणे : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, ड्रीम वर्क्स रिअल्टर्सने बालेवाडी येथे एक अनोखी आणि दीर्घकालीन वृक्षारोपण मोहीम राबवली. “रुटींग फॅार ग्रीनर टुमारो” (Rooting for a Greener Tomorrow) या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम केवळ प्रतिकात्मक नसून, पर्यावरणीय शाश्वततेसाठी एक ठोस पाऊल आहे.

सदर कार्यक्रम मा. नगरसेवक अमोल बालवडकर, कामगार नेते श्री जालिंदर बालवडकर, श्री. दिलीप बालवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व ड्रीम वर्क्स रिअल्टर्स परिवाराच्या सहभागातून संपन्न झाला.

या मोहिमेअंतर्गत १०० हून अधिक झाडांची लागवड करण्यात आली असून, प्रत्येक झाड दोन कर्मचाऱ्यांच्या जोडीकडे सुपूर्त करण्यात आले आहे. प्रत्येक झाडाला एक वैयक्तिक नाव देण्यात आले असून, जलरोधक फलकासह त्याचे दस्ताऐवजीकरणही करण्यात आले आहे. ही अभिनव संकल्पना कर्मचाऱ्यांमध्ये निसर्गाशी नातं निर्माण करते, तसेच दीर्घकालीन जबाबदारीची भावना वाढवते.

ड्रीम वर्क्स रिअल्टर्सने या उपक्रमासाठी कार्यविभागाची स्पष्ट रचना आखली आहे. नियमित पाणीपुरवठा आणि पर्यावरणीय सहाय्य कंपनीकडून करण्यात येणार असून, खत व्यवस्थापन आणि झाडांची आरोग्य तपासणी ही जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर असेल. प्रत्येक रोपाची वाढ आणि जोपासना ही दीर्घकालीन पद्धतीने केली जाणार आहे.

कार्यक्रमात बोलताना ड्रीम वर्क्स रिअल्टर्सचे संचालक श्री. नरेंद्र बालवडकर यांनी सांगितले, “आमची दृष्टी केवळ भौतिक विकासापुरती मर्यादित नाही, तर पर्यावरणीय समतोल राखण्याचीही आमची तितकीच बांधिलकी आहे. हा उपक्रम म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी ड्रीम वर्क्स रिअल्टर्सने घेतलेली सजग आणि दीर्घकालीन जबाबदारी आहे.

या उपक्रमात कंपनीचे कर्मचारी, पर्यावरणप्रेमी नागरिक आणि स्थानिक रहिवासी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. ड्रीम वर्क्स रिअल्टर्सने याच्या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्राने शाश्वत शहरी विकासात पुढाकार घेण्याचा एक सकारात्मक संदेश दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29.5 ° C
29.5 °
29.5 °
50 %
4.1kmh
1 %
Wed
29 °
Thu
36 °
Fri
37 °
Sat
37 °
Sun
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!