33.9 C
New Delhi
Sunday, June 8, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत कॅन्सर रुग्णालय, पाणीपुरवठा व इतर महत्त्वपूर्ण प्रकल्पांना...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत कॅन्सर रुग्णालय, पाणीपुरवठा व इतर महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मान्यता

pcmc news- पिंपरी,- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात आज स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत थेरगाव येथे १०० बेडचे मल्टी स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच क्रांतीवीर चापेकर स्मारक लोकार्पण, मिळकत कर संगणक प्रणाली देखभाल, शहर कृती आराखडा सर्वेक्षण, विविध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जलपुरवठा आणि जलनि:सारणाच्या सुधारणा, डिजिटल क्लासरूमसाठी यंत्रणा खरेदी, हेल्थ केअर सिस्टीम देखभालसाठी मुदतवाढ, रस्ते दुरुस्ती, नाली दुरुस्ती, वॉल्व्ह बसविणे, जलशुद्धीकरण केंद्रावरील गाळ काढणे अशा अनेक प्रकल्पांना आणि वाढीव खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.

याशिवाय, UDCPR 2020 अंतर्गत विकास शुल्क व प्रशमन शुल्क दर आकारणीस मान्यता देण्यात आली. शहराच्या ४०% भागात पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी शासनाकडून निधी न मिळाल्यास महापालिका फंडातून निधी वर्ग करण्यासही मान्यता देण्यात आली.

या निर्णयांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
33.9 ° C
33.9 °
33.9 °
27 %
1.8kmh
0 %
Sat
34 °
Sun
44 °
Mon
46 °
Tue
45 °
Wed
45 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!