चिंचवड,- मान्सूनपूर्व काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी थेट मैदानात उतरत शहरातील विविध भागांचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नाल्यांची सफाई, अतिक्रमण हटवणे, खड्डे भरून काढणे, वाहतुकीचे नियोजन आणि जलनिचऱ्याच्या अडथळ्यांवर उपाय यासाठी विविध विभागांना तातडीचे आदेश दिले.
🔹 पुनावळे परिसरात जलनिचऱ्याच्या उपाययोजना
पुनावळे अंडरपास व भारत पेट्रोल पंपासमोरील भागात रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करून नवीन स्ट्रॉम वॉटर लाईन टाकण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण तत्काळ हटवण्यास सांगितले.

🔹 किवळे आणि समीर लॉन्स परिसर
समीर लॉन्स अंडरपासजवळ जुन्या लाईनमधील अडथळ्यामुळे नव्या स्ट्रॉम वॉटर लाईनची गरज ओळखून ती तातडीने टाकण्यास सांगितले. किवळेतील नाल्यांमध्ये अडलेल्या गाळाची साफसफाई आणि स्क्रिनिंगचे अर्धवट काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
🔹 वाहतूक नियोजन
मुकाई चौक ते वाकड दरम्यानच्या वाहतूककोंडीसाठी, एकेरी वाहतुकीचा प्रयोग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बीआरटीएस व स्थापत्य विभागाला यासाठी योग्य पावले उचलण्यास सांगितले.

🔹 स्मशानभूमी व सोसायटी परिसरातील कामे
वाल्हेकरवाडी स्मशानभूमीचे अपूर्ण काम, गोखले वृंदावन, शांतीवन व सिल्वर गार्डन सोसायटीतील पाणी साचण्याच्या समस्यांवर तातडीने उपाय करणे, तसेच चापेकर चौक ते वाल्हेकरवाडी कॉर्नरपर्यंत नवीन रस्ता तयार करण्यासाठी स्ट्रॉम वॉटर लाईन टाकण्याचे आदेश देण्यात आले.
🔹 एनएचएआयच्या कामांवरही लक्ष
सर्व्हिस रोडच्या अपूर्ण कामांबाबत एनएचएआयला लवकरात लवकर कामे पूर्ण करून पावसाच्या पाण्याचा नीट निचरा व्हावा, यासाठी खास निर्देश दिले गेले.
🔹 दौऱ्यात सहभागी मान्यवर
या दौऱ्यात माजी पदाधिकारी, नगरसेवक, विभाग प्रमुख, NHAI व PMC अधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर तातडीने कारवाईचे आश्वासन देण्यात आले.