पुणे : पुणे.नगर.नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे कुलदैवत असलेल्या धामणी ( तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात सोमवारी (दिं.२२) स्वयंभू सप्तशिवलिंग व खंडोबा.म्हाळसाई. व बाणाईच्या उत्सवमूर्तीसमोर पारंपारिक वाद्याच्या निनादात घटस्थापना करण्यात आली. मंदिर परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. सोमवारी पहाटे स्वयंभू सप्तशिवलिंगाचा पंचामृताने दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक निलेश रोडे व सौ साधना रोडे यांच्याकडून करण्यात आला. त्यानंतर सप्तशिवलिंगावर खंडोबा, म्हाळसाई व बाणाईच्या सर्वांगसुंदर पंचधातूच्या मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी सदानंदाचा येळकोट करुन भंडारा उधळण्यात आला. त्यानंतर गाभार्यातील देवाच्या पूर्वमुखी खंडोबा.म्हाळसाई बाणाईच्या व उत्तरमुखी खंडोबाची मानलेली बहीण जोगेश्वरी यांच्या देखण्या मूर्तीना वस्रालंकार घालण्यात आले. पहाटे सेवेकरी दादाभाऊ भगत.प्रभाकर भगत.सुभाष तांबे.शांताराम भगत. राजेश भगत पांडुरंग भगत.नामदेव भगत यांच्यासह ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत विधिवत पारंपारिक पूजा.आरती करण्यात आली. त्यानंतर गाभार्यातील सप्तशिवलिंगासमोर नवरात्राच्या घटाची प्रतिष्ठापना “सदानंदाचा येळकोट” ” जय मल्हार” च्या जयघोषात भंडारा उधळून पाकळणी करण्यात आली.नवरात्राच्या पहिल्या माळेला नागिणीच्या पानाची माळ व दही भाताचा नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले.यावेळी धामणी.लोणी.खडकवाडी.गावडेवाडी. महाळुंगे पडवळ.संविदणे.अवसरी खुर्द. तळेगांव ढमढेरे येथील भाविक उपस्थित होते .महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती . खंडोबा मंदिराचे शिखरावर व परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आलेली आहे.
New Delhi
mist
13.1
°
C
13.1
°
13.1
°
76 %
0kmh
0 %
Wed
19
°
Thu
25
°
Fri
26
°
Sat
26
°
Sun
25
°


