27.1 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रमहापालिकेची ५० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह सीएसआर भागीदारी मजबूतशहरव्यापी लोककल्याणकारी प्रकल्पांना मिळाली...

महापालिकेची ५० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह सीएसआर भागीदारी मजबूतशहरव्यापी लोककल्याणकारी प्रकल्पांना मिळाली चालना

पिंपरी, – पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील नागरी सुविधा आणि लोककल्याणकारी प्रकल्पांना गती देण्यासाठी ५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) भागीदारी अधिक बळकट केली आहे. या अनुषंगाने चिंचवड येथे आयोजित विशेष बैठकीत विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि सीएसआर सल्लागार उपस्थित होते.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण या क्षेत्रांतील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सीएसआर निधी, कंपन्यांचा अनुभव आणि कौशल्याचा उपयोग करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “शहराचा झपाट्याने होणारा विस्तार लक्षात घेता सर्वसमावेशक विकासासाठी केवळ निधी नव्हे, तर कंपन्यांचे मानव संसाधन आणि तंत्रज्ञानही महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मोरवाडीतील दिव्यांग भवन, लाइटहाउस कौशल्य विकास उपक्रम, भोसरीतील शिवणकला केंद्र आणि मोशीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यांसारख्या महत्त्वपूर्ण सीएसआर प्रकल्पांचा उल्लेख केला.

महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी आणि सीएसआर प्रमुख नीळकंठ पोमण यांनी सांगितले की, “महापालिका गेल्या पाच वर्षांपासून या बैठकीद्वारे सीएसआर उपक्रमांना चालना देत आहे. त्यामुळे रुग्णालये, शाळा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांना भरीव मदत मिळाली आहे. नागरिकांना सीएसआरचा सकारात्मक परिणाम स्पष्टपणे जाणवत आहे.”

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपमुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उपआयुक्त सचिन पवार, पंकज पाटील, सहायक आयुक्त उमेश ढाकणे, प्रशासन अधिकारी संगिता बांगर तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. विविध विभागप्रमुखांनी प्रस्तावित प्रकल्पांची माहिती देत सीएसआर प्रतिनिधींशी थेट संवाद साधला.

कंपन्यांच्या सीएसआर प्रतिनिधींनी त्यांच्या चालू व नियोजित प्रकल्पांची सादरीकरणे केली. महापालिकेच्या विभागप्रमुखांनी सहकार्याच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली. सीएसआर सल्लागार विजय वावरे आणि श्रुतिका मुंगी यांनी महापालिकेस मिळालेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मानांचा आणि सीएसआरद्वारे साध्य झालेल्या विकासकामांचा आढावा दिला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सीएसआर सेल प्रमुख निळकंठ पोमण यांनी उपस्थितांचे आभार मानले. “पिंपरी चिंचवडला अधिक समावेशक, शाश्वत आणि भविष्याभिमुख शहर बनवण्यासाठी दीर्घकालीन सीएसआर भागीदारी अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.

या बैठकीमुळे शहरातील लोककल्याणकारी प्रकल्पांना नव्या उंचीवर नेण्याचा मार्ग मोकळा झाला असून, महापालिकेच्या पुढाकारामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
light rain
27.1 ° C
27.1 °
27.1 °
89 %
4kmh
100 %
Mon
30 °
Tue
34 °
Wed
36 °
Thu
35 °
Fri
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!