29.2 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी चिंचवड महापालिका १ जुलैपासून मालमत्ता कर वसुलीसाठी राबवणार व्यापक मोहीम !

पिंपरी चिंचवड महापालिका १ जुलैपासून मालमत्ता कर वसुलीसाठी राबवणार व्यापक मोहीम !

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने १ जुलै २०२५ पासून मालमत्ता कर वसुलीची मोहीम अधिक व्यापक स्वरुपात राबवण्याचे नियोजन केले आहे. वारंवार आवाहन करून तसेच जप्तीची नोटीस देऊन देखील कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्याची मोहीम महापालिकेकडून हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी चालू आर्थिक वर्षातील तसेच थकीत कर तात्काळ भरावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांसाठी ३० जून २०२५ पर्यंत संपूर्ण कराचा भरणा ऑनलाइन स्वरूपात केल्यास १० टक्के सवलत देण्यात आली होती . याशिवाय महापालिकेने ३० जून २०२५ पर्यंत विविध कर सवलती जाहीर केल्या आहेत. आता या सवलतींचा लाभ घेण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहेत. ही योजना संपल्यानंतर मात्र १ जुलैपासून महापालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी व्यापक मोहीम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अद्यापही ज्या थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांना जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात येणार असून यापूर्वी ज्यांना अशी नोटीस दिली आहे, त्यांच्यावर केव्हाही जप्तीची कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये निवासी मालमत्ता धारकांचे वाहन, टीव्ही, फ्रिजसारख्या वस्तू जप्त करण्यात येणार आहे, अशी माहिती कर संकलन आणि कर आकारणी विभागातून देण्यात आली. तरी नागरिकांनी आपला चालू आर्थिक वर्षातील तसेच थकीत कर भरून या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

कारवाई टाळण्यासाठी कर भरा

ज्या मालमत्ताधारकांनी धनादेशाद्वारे कराचा भरणा केला, परंतू त्यांचे धनादेश वटले नाहीत, अशा मालमत्तांधारकांना लवकरच जप्ती अधिपत्र पाठवून त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. ही जप्तीची कारवाई टाळण्यासाठी सदर मालमत्ताधारकांनी ३० जूनपूर्वी आपला मालमत्ता कर ऑनलाईन किंवा रोख स्वरूपात भरावा, असे कर संकलन आणि कर आकारणी विभागातून सांगण्यात आले.
……

३० जूनपर्यंत असणाऱ्या सवलतीचा लाभ घेतलेले आत्तापर्यंतचे मालमत्ताधारक (एकूण लाभार्थी संख्या):

महिला मालमत्ताधारक: १५,१५१
माजी सैनिक: ३,७९०
दिव्यांग मालमत्ताधारक: १,५६१
शौर्यपदधारक: ९
पर्यावरणपूरक मालमत्ता: १३,९०१
आगाऊ कर भरणारे: ३८,९१७
ऑनलाईन आगाऊ भरणा करणारे: २,८६,८४०

 …..

१ एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत
१८ विभागीय कार्यालयांमधून एकूण ४६५.५५ कोटींचे कर संकलन

वाकड – ५७.९५ कोटी
थेरगाव – ४३.२९ कोटी
चिखली – ३५.६७ कोटी
कस्पटे वस्ती – ३४.७० कोटी
किवळे – ३०.८४ कोटी
भोसरी – ३०.७९ कोटी
चिंचवड – ३०.२९ कोटी
पिंपरी वाघेरे – ३० कोटी
मोशी – २७.०३ कोटी
सांगवी – २५.३० कोटी
मनपा भवन – २४.५६ कोटी
आकुर्डी – २१.८५ कोटी
फुगेवाडी दापोडी – १६.४९ कोटी
चऱ्होली – १४.३५ कोटी
निगडी प्राधिकरण – ११.९६ कोटी
तळवडे – १०.८६ कोटी
दिघी बोपखेल – १०.४९ कोटी
पिंपरी नगर – ३.७१ कोटी
….

पिंपरी चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. वारंवार आवाहन करून देखील मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्यांवर जप्ती सारखी कठोर कारवाई करण्याचे नियोजन आहे. १ जुलैपासून यासाठी व्यापक मोहीम हाती घेणार आहोत.  त्यामुळे जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी तात्काळ मालमत्ता कर भरून भविष्यात होणारी कारवाई टाळावी.
– प्रदीप जांभळे पाटील,  अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
…..

पिंपरी चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ३० जून २०२५ पर्यंत विविध कर सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता फक्त एक दिवसच संधी बाकी आहे. त्यामुळे ३० जून पूर्वी संपूर्ण कराचा भरणा करून सवलतींचा लाभ घ्यावा.

– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
29.2 ° C
29.2 °
29.2 °
78 %
3.2kmh
18 %
Wed
37 °
Thu
39 °
Fri
38 °
Sat
35 °
Sun
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!