6.1 C
New Delhi
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रशहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी ओला व सुका कचरा स्वतंत्र द्यावा!

शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी ओला व सुका कचरा स्वतंत्र द्यावा!

पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन

पिंपरी, – : पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नागरिक कचरा वर्गीकरणाचे नियम पाळत असले तरी, अद्यापही काही भागांमध्ये ओला व सुका कचरा एकत्र दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत असणारे नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार प्रत्येक नागरिकाने घरगुती तसेच व्यावसायिक कचऱ्याचे वर्गीकरण करून देणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या उपक्रमांमधून नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांमध्ये ‘कचरा विलगीकरण हीच खरी स्वच्छतेची गुरुकिल्ली आहे’ अशी जाणीव दृढ केली जात आहे.

तसेच महापालिकेने कचरा विलगीकरणाच्या दृष्टीने सोसायट्या आणि संस्थांना दोन वेगवेगळ्या रंगांचे डबे उपलब्ध करून दिले असून त्यांचा योग्य वापर केल्यास कचऱ्याचे प्रभावी वर्गीकरण होईल. या प्रक्रियेमुळे पुढील टप्प्यांमध्ये कंपोस्टिंग, पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती सुलभ होईल. त्यामुळे नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून स्वच्छ, आरोग्यदायी व पर्यावरणपूरक शहरनिर्मितीत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
……
कचऱ्याचे प्रकार आणि वर्गीकरण

ओला कचरा : भाजीपाल्याच्या साली, अन्नाचे उरलेले तुकडे, फुलांचा कचरा, बागेतील पाने व अन्य जैविक कचरा.

सुका कचरा : प्लास्टिक, कागद, धातू, बाटल्या, पॅकेजिंग साहित्य, थर्माकोल व इतर पुनर्वापरयोग्य वस्तू.

घरगुती घातक कचरा : ट्यूबलाईट, बॅटऱ्या, बल्ब, तुटलेल्या धारदार वस्तू, केमिकल्स, इंजेक्शन, जैववैद्यकीय कचरा.

सॅनिटरी कचरा : सॅनिटरी पॅड्स, डायपर्स, बॅंडेजेस.

ई-कचरा : खराब संगणक, लॅपटॉप, सीपीयू, टेलिव्हिजन संच, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी.
….
निरीक्षण पथकांची नियुक्ती

महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासाठी स्वतंत्र निरीक्षण पथके नियुक्त केली आहेत. ही पथके दररोज कचरा संकलनावेळी विलगीकरणाची तपासणी करतात. विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांवर, सोसायट्यांवर किंवा व्यावसायिक आस्थापनांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
…..

पिंपरी चिंचवड स्वच्छ व सुंदर ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी कचरा वर्गीकरणाचे नियम पाळून सहकार्य करावे, जेणेकरून शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि पर्यावरणपूरक होईल.
विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
…..
कोट

पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत, परंतु नागरिकांचा सक्रीय सहभाग सर्वात महत्त्वाचा आहे. प्रत्येक घर आणि संस्थेने जबाबदारपणे कचरा विलगीकरण केल्यास आपले शहर ‘स्वच्छतेचा आदर्श’ ठरेल.
डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
6.1 ° C
6.1 °
6.1 °
100 %
2.1kmh
0 %
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!