9.1 C
New Delhi
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रआमदार शंकर जगताप यांच्याकडून शिवसेना उबाठा गटाला धक्का!

आमदार शंकर जगताप यांच्याकडून शिवसेना उबाठा गटाला धक्का!

  • शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश
  • निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदारांकडून “पत्ते ओपन” करायला सुरुवात!

पिंपरी, : भारतीय जनता पक्षाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांसाठी निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर आमदार शंकर जगताप यांनी आपले “पत्ते ओपन” करायला सुरुवात केली आहे. एकीकडे भेटीगाठी, सोसायट्यांमधील नागरिकांच्या प्रश्नांवर संवाद या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ देत असतानाच दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशही केले जात आहेत. या माध्यमातून नुकताच शिवसेना उबाठा गटातील माजी नगरसेवक यांच्या पत्नीसह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांचा भाजप पक्ष प्रवेश मंगळवारी केला गेला.

भारतीय जनता पक्षाचे आमदार, पक्षाचे माजी शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यावर भाजपाने मोठी जबाबदारी टाकली आहे. आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष सरसावलेले आहेत. महापालिका काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने शांत, संयमी आणि उच्चशिक्षित चेहरा म्हणून ओळख असणाऱ्या आमदार शंकर जगताप यांना निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. तीस लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील मतदारांसमोर भाजपने पिंपरी चिंचवड शहरासाठी पक्षाचा “ब्रँड फेस” म्हणून जगताप यांना निवडणुकीची कमान सोपवली आहे.

पक्षाने टाकलेली जबाबदारी सांभाळत आमदार जगताप यांनी आता आपले ‘पत्ते ओपन” करायला सुरुवात केली आहे. याच माध्यमातून बैठका, पदाधिकाऱ्यांची चर्चा, गृहनिर्माण संस्था तसेच सोसायट्यांमध्ये संवाद मेळावे आयोजित केले जात आहेत. यामध्ये नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करत त्यावर आमदारांकडून तोडगा काढला जात आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणजे इतर पक्षातील कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.


उबाठा गटाला धक्का!

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची कमान सांभाळताच आमदार शंकर जगताप यांनी शिवसेना उबाठा गटाला धक्का दिला आहे. शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक रघुनाथ वाघ यांच्या पत्नी उपशहर संघटक रजनी रघुनाथ वाघ आणि शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी प्रभाग क्रमांक १७ मधील आजी माजी पदाधिकारी तसेच भाजपचे माजी सभागृह नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.


यांनी केला पक्षप्रवेश!

सुरेखा वाघ, मंदाकिनी वाघ, सारिका बागुल, रवींद्र पाटील, वंदना पाटील, रमेश भदाणे, सुनंदा भदाणे, रमेश बिरारी, प्रदीप भदाणे ,रामेश्वर ईशी, नितीन पाटील ज्ञानेश्वर महाजन, विठोबा महाजन, पल्लवी वाघ, रवींद्र महाजन, नितीन महाजन, भाऊसाहेब महाजन, भाऊसाहेब पेंटर, प्रशांत अहिरे,युवराज अहिरे , आशा अहिरे, पूजा अहिरे, वाल्मीक पाटील, गायत्री पाटील, रवींद्र जगताप, आर के महाजन, योगेश माळी यांनी भाजपमध्ये शिवसेनेतून प्रवेश केला आहे.


पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर मेट्रो रस्त्यांचे प्रशस्त जाळे, सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय, नवनवीन प्रकल्प यामधून शहराचा कायापालट झालेला सर्व नागरिकांनी पाहिला आहे. येथील नागरिकांचा भाजपला पाठिंबा आहे. आगामी काळात शहर भाजपच्या माध्यमातून शहराचा विकास होणार आहे. म्हणून कार्यकर्त्यांची मागणी, पदाधिकाऱ्यांचा आग्रह यातून शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

रजनी रघुनाथ वाघ


भाजपने पिंपरी चिंचवड शहराच्या निवडणूक प्रमुख म्हणून शहराची जबाबदारी दिली आहे ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यात येईल. नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाली. भाजपामध्ये येण्यास शहरातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहेत. महापालिका निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार भाजपकडे आहेत. कार्यकर्त्यांच्या जोरावर ही निवडणूक नक्कीच यशस्वी होणार आहे. या निवडणुकीत महापौर हा भाजपचाच असेल असा विश्वास आहे.

शंकर जगताप
निवडणूक प्रमुख, पिंपरी चिंचवड शहर.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
9.1 ° C
9.1 °
9.1 °
81 %
1kmh
1 %
Tue
12 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!