26.2 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeमहाराष्ट्रडास प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत महापालिकेची कारवाई सुरू

डास प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत महापालिकेची कारवाई सुरू

सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्यांना केला दंड

पिंपरी,- : पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभागाची डेंग्यू, मलेरिया आणि इतर डासजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी विशेष बैठक पार पडली. या बैठकीत डेंग्यू मलेरियाच्या अनुषंगाने घरांची तपासणी करणे, कंटेनर तपासणी करणे, भंगार दुकानाची तपासणी, औषध फवारणी, तसेच डेंग्यू आणि मलेरियाबाबत उपाययोजना आणि दंडात्मक कारवाईची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सध्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी विशेष मोहीम देखील राबवत आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे व उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या मोहिमे अंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

महानगरपालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत समन्वय साधून करण्यात आलेली कारवाई

  • घरांची तपासणी : एकूण १ लाख ८४ हजार १०६ घरांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ हजार ७९ घरांच्या परिसरात डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले.
  • कंटेनर तपासणी : ९ लाख ५६ हजार ४१८ कंटेनरपैकी ३ हजार ४०१ कंटेनरमध्ये डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले.
  • भंगार दुकाने – ४४२ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली.
  • बांधकाम स्थळे – ६९७ बांधकाम स्थळांची तपासणी करून त्यामध्ये अस्वच्छता व पाणी साचल्याचे निदर्शनास आले.
  • नोटीस व दंड – १ हजार २९२ ठिकाणी नोटीस बजावण्यात आल्या असून १२२ नागरिक व आस्थापनांवर थेट दंडात्मक कारवाई करत ३ लाख ३६ हजार इतकी दंडची रक्कम वसूल करण्यात आली.

डेंग्यू प्रतिबंधासाठी राबवण्यात येणारे जनजागृती उपक्रम

  • नियमित औषध फवारणी
  • घरोघरी माहिती पत्रके वाटप
  • शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
  • स्थानिक पातळीवरील जनजागृती कार्यक्रम
  • सार्वजनिक स्वच्छता मोहिम
    …..
    कोट
    नागरिकांनी पावसाळी वातावरणात डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी छतावरील पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुंड्या, टायर, वापरात नसलेली भांडी या ठिकाणी पाणी साचू देऊ नये. आठवड्यातून एकदा ‘ड्राय डे’ पाळावा आणि स्वच्छता ठेवावी. महापालिकेमार्फत नियमित औषध फवारणी केली जात असून नागरिकांनी त्यात सहकार्य करावे.
    — शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

…..

कोट :

डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग विविध उपाययोजना करीत आहे. नागरिकांनी देखील आपले घर व परिसरात डासांची उत्पत्ती होण्यास प्रतिबंध घालावा. वारंवार सूचना देऊनही अंमलबजावणी होत नसेल तर होणाऱ्या दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल.

—सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
26.2 ° C
26.2 °
26.2 °
46 %
2.6kmh
0 %
Thu
26 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!