17.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे मनपा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष रवि चौधरी यांना ‘डॉक्टरेट’ प्रदान

पुणे मनपा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष रवि चौधरी यांना ‘डॉक्टरेट’ प्रदान

मुंबई येथे रेडिसन ब्ल्यू हॉटेल येथे झालेल्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिस (फ्रान्स) ‘डॉक्टोरल मॉनिटरिंग बोर्ड’च्या ‘इंडो–युरोपियन समिट अॅण्ड अवॉर्ड–२०२५’तर्फे आयोजित कार्यक्रमात पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष व करीयर महोत्सवाचे आयोजक रवि चौधरी यांना ‘शिक्षण व्यवस्थापन’ क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘डॉक्टरेट’ पदवी प्रदान करण्यात आली.गेली २४ वर्षे डॉ. रवि चौधरी पालक व विद्यार्थांना करीयरच्या संधीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी भव्य “करियर महोत्सवाचे आयोजन करतात. तसेच शिक्षण मंडळाच्या माध्यमातूनही विद्यार्थांना नौकरी व व्यवसायाच्या दृष्टीने उपयोगी पडतील असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. त्याशिवाय मॉरिशस मधील ५०हून अधिक मूळ निवासी मराठी विद्यार्थांना पुण्यामध्ये उच्च शिक्षणासाठी विशेष सहयोग दिला.
यावेळी प्रिन्स लर्निंग सेंटर मलेशियाचे डायरेक्टर डॉ. नासीर अफिज्जाद्दीन, विद्यार्थी समुपदेशक डॉ. राखी काळेसकर, थेम्स इंटरनॅशनल युनिव्हसिर्टीच्या व्हाइस चॅन्सलर (एशिया) डॉ. प्रियदर्शी नायक, ‘टीटीआययू’चे अॅकॅडेमिक डॉ. हरन्स लालकैला, प्रा. राकेश मित्तल, डॉ. अमित बागवे, डॉ. अब्बास लोखंडवाला, डॉ. शरद जोशी, डॉ. संदीप बागडे, डॉ. राजेश शिंदे आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यावर याप्रसंगी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
45 %
2.1kmh
20 %
Tue
20 °
Wed
21 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!