पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक 19 ड सर्वसाधारण गटाचे अधिकृत उमेदवार अनिकेत सोनवणे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष सुंदरजी कांबळे साहेब आणि नागरी हक्क संघर्ष समिती अध्यक्ष ॲड अनिल सोनवणे साहेब यांचा जाहीर पाठिंबा आज पिंपरी येथे देण्यात आला जाहीर पाठिंबा देत असताना सुंदर जी कांबळे साहेब यांनी प्रभाग क्रमांक 19 मधील सर्व इच्छुक उमेदवारांना एकत्र बोलून त्यांनी प्रभागाच्या हितासाठी काय उपाययोजना राबवणार आहेत याचा संदर्भात सर्व उमेदवारांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या होत्या या मुलाखती घेतल्यानंतर त्यांना प्रभाग क्रमांक 19 ड मधून अनिकेत सोनवणे हा पर्याय प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य वाटला आणि त्यांनी अनिकेत सोनवणे यांना प्रभाग क्रमांक 19 ड मधून जाहीर पाठिंबा दिला पाठिंबा देत असताना सुंदर जी कांबळे साहेब म्हणाले की अनिकेत सोनवणे हे एक सुशिक्षित घरातील एक तरुण नेतृत्व असून ते स्वतः एक वकील आहेत आणि प्रभाग क्रमांक 19 हा भाग शहरातील सर्वात मोठ्या 15 झोपडपट्ट्याने व्यापलेला आहे या झोपडपट्ट्यांमध्ये गुन्हेगारीचं व्यसनाधीनतेच प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे हे सर्व जर कुठे रोखायचे असेल तर एक सुशिक्षित घरातील उमेदवार आपल्याला या ठिकाणी दिला पाहिजे अनिकेत सोनवणे हे स्वतः वकील असल्यामुळे त्यांना या प्रभागाच्या विकासासाठी काय उपाययोजना राबवाव्या याचा प्रदीर्घ अभ्यास आहे त्यामुळे अनिकेत सोनवणे यांना दिलेला पाठिंबा हा निश्चितच ताकतीने उभा राहून या पिंपरी चिंचवड शहरांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा 19 ड सर्वसाधारण गटातून नगरसेवक म्हणून निवडून जातील असा विश्वास त्यांनी यावेळेस वर्तवला आहे त्याचबरोबर उमेदवार अनिकेत सोनवणे यांनी सांगितले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी दिलेला जो पाठिंबा आहे तो केवळ एक राजकीय पाठिंबा नसून तो एक विचारांचा पाठिंबा आहे या देशातील दोन प्रमुख आंबेडकरी चळवळी म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ह्या आहेत या दोन्ही चळवळीने एकमताने दिलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता प्रभागाच्या आणि चळवळीच्या हितासाठी मी अहोरात्र कष्ट करेल असे वचन यावेळेस अनिकेत सोनवणे यांनी दिले
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिकेत सोनवणे यांना जाहीर पाठिंबा
RELATED ARTICLES
New Delhi
haze
17.1
°
C
17.1
°
17.1
°
45 %
3.1kmh
18 %
Tue
17
°
Wed
20
°
Thu
22
°
Fri
23
°
Sat
25
°


